आत्महत्या करावी वाटतेय; स्वारगेट प्रकरणातील पीडितेच्या फोनने वसंत मोरेंना अश्रू अनावर

आत्महत्या करावी वाटतेय; स्वारगेट प्रकरणातील पीडितेच्या फोनने वसंत मोरेंना अश्रू अनावर

Swargate case victim’s phone call Vasant More to tears : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Swargate) पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. त्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर नुकतच या पीडितेचा त्यांना फोन आला असताना तिने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यावेळी तिने आत्महत्या करावी वाटतेय असं म्हटल्याने वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले होते.

नेमकं काय झाले?

यावर बोलताना वसंत मोरे म्हणाले की मला अगोदर तिच्या मित्राचा फोन आला आंदोलन केल्याबद्दल आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे असं त्यांनी सांगितलं त्यावेळी ती मुलगी बोलली की, त्यावेळी तिने सर्व घटनाक्रम सांगितला तसेच ती म्हणाली की आता मला आत्महत्या करावी वाटते कारण सर्वांना ही घटना सांगून मी वैतागली आहे. त्यामुळे मला मी अपराधी वाटू लागली आहे. आरोपी पेक्षा जास्त माझीच चौकशी आणि पोलीस स्टेशनला भेटी घ्यायला लावत आहेत.

औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अबू आझमींनी उधळली स्तुतीसुमनं

त्यामुळे माझ्या अंगात आता त्राण राहिलेला नाही त्यामुळे मला मार्ग दाखवा अशी मागणी या पिडीतेने केल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. तसेच या पिडीतेने सर्व घटना ज्या बसमध्ये ती फलटणला गेली त्या बसच्या ड्रायव्हर कंडक्टरला सांगितली होती मात्र त्यांनी त्यावेळी तिला कुठलीही मदत न केल्याचं मोरे यांनी सांगितलं. तसेच तिने मला जेव्हा फोन केला त्यावेळी ती मला कधी ओळखतही नसणारी मला म्हणाली की तात्या मला वाचवा ती मला माझ्या मुलीप्रमाणे वाटली.

घटना नेमकी की काय?

पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचाराची घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटण्याच्या दिशेने जात होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकावर थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले.

रणवीर अलाहाबादियाला दिलासा! शो सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी; मात्र एका अटीवर

यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली. त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube