Nicholas Pooran Retirement : वेस्टइंडिज संघातील धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने (Nicholas Pooran Retirement) अवघ्या 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (International Cricket) जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयाने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. निकोलस आयपीएलमध्ये (IPL) लखनऊ संघाकडून खेळताना दिसला होता. निवृत्तीची घोषणा करताना निकोलसने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत निकोलसने एकूण 61 टी 20 आणि 106 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दोन्ही प्रकारांत त्याने चार हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. निकोलस आणखी काही वर्षे खेळू शकला असता. परंतु, त्याने अचानक क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. माझ्यासाठी हा निर्णय घेणं खूप कठीण काम होतं. पण मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय असे निकोलसने म्हटलं आहे.
टीम इंडियाच्या ट्रेनिंग जर्सीचा बदलला लूक, स्टायलिश अन् स्मार्ट; तुम्हीही पाहा
मरून कलरची जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीतासाठी उभं राहणं आणि प्रत्येक वेळी मैदानात असताना सर्वतोपरी देत राहणं. माझ्यासाठी या गोष्टींचा अर्थ काय हे शब्दांत सांगणं खूप कठीण आहे. संघाचा कर्णधार होणं ही सन्मानाची मोठी बाब आहे जी नेहमीच माझ्या स्मरणात राहील, असे निकोलस पूरनने त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
निकोलसचं क्रिकेट करिअरही धक्क्यांचंच राहीलं. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 2019 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध बॉल टेम्परिंगच्या आरोपानंतर काही काळ निकोलसला निलंबित करण्यात आलं होतं. पण, यातूनही त्याने लवकरच वापसी केली. किरॉन पोलार्डच्या गैरहजेरीत संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याच्या कप्तानीत वेस्टइंडिजने ऑस्ट्रेलियाला 4-1 अशा फरकाने पराभूत केले होते.
सन 2022 मध्ये निकोलसला एकदिवसीय संघाचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण, ऑस्ट्रेलियातील टी 20 विश्वचषकात संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
निकोलस पूरनने एकूण 106 टी 20 सामन्यांत 2 हजार 275 धावा केल्या आहेत. या सामन्यांत त्याचा स्ट्राइक रेट चांगला होता. त्यामुळे विरोधी संघासाठी तो कायमच आव्हानात्मक असायचा. निकोलसने एकूण 61 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने तीन शतके झळकावली आहेत. सन 2019 मधील वर्ल्डकप स्पर्धेत निकोलसने वेस्टइंडिज संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याच्या क्रिकेटमधील निवृत्तीनंतर अनेक दिग्गजांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.