Yashasvi Jaiswal Century : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी (IND vs ENG Test Series) सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाचा (Team India) फलंदाज यशस्वी जैस्वालने कमाल (Yashasvi Jaiswal) केली. या सामन्यात त्याने शानदार शतक केले. या मालिकेतील हे 19 वं शतक आहे. यामुळे या मालिकेत एक खास रेकॉर्ड बनले आहे. या मालिकेत आतापर्यंत 19 शतके झाली आहेत. जैस्वालने 19 वे शतक आज केले. या मालिकेत जैस्वालचे हे दुसरे शतक आहे. तर भारतीय संघाचं 12 वं शतक आहे. इंग्लंडकडून मालिकेत आतापर्यंत सात शतके झाली आहेत.
एका मालिकेत सर्वाधिक वैयक्तिक शतकांच्या बाबतीत ही मालिका कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. याआधी सन 1955 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज यांच्यातील (AUS vs WI) मालिकेत एकूण 21 शतके झाली होती. तर 2003-04 मध्ये वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत 20 शतके झाली होती. आता या मालिकेत एकूण 19 शतके झाली आहेत. यानंतर इंग्लंडची फलंदाजी बाकी आहे. त्यामुळे शतकांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरु असताना इशान किशनवर मोठी जबाबदारी; बीसीसीआयने केली घोषणा
या मालिकेत एकट्या भारतीय संघाकडून बारा शतके झाली आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्यांदा असं घडलं आहे. एकाच मालिकेत एका संघाकडून 12 शतके होण्याची ही चौथी वेळ आहे. संयुक्त रुपात एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके करण्याचे रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि आता भारताच्या नावावर आहे. या सर्व संघांनी एका मालिकेत 12-12 शतके केली आहेत.
ऑस्ट्रेलियाने 1955 मध्ये वेस्टइंडिज विरुद्धच्या मालिकेत 12 शतके केली होती. त्यानंतर पाकिस्तानने 1982 -83 मधील भारताविरुद्धच्या मालिकेत 12 शतके केली होती. दक्षिण आफ्रिकेने 2003-04 मध्ये घरच्या मैदानावर खेळताना वेस्टइंडिज विरुद्ध 12 शतके केली होती. यानंतर आता टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत हा कारनामा केला आहे.