Download App

सामना गमावला, मालिका गमावली अन् गोलंदाजही चुकला; आयसीसीने दिली मोठी शिक्षा, काय घडलं?

शेवटच्या सामन्या दरम्यान झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी असे एक कृत्य केले ज्यावर आयसीसीने (ICC) कठोर कारवाई केली आहे.

SA vs ZIM : झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी (SA vs ZIM) मालिकेतील दुसरा सामना बुलावायोतील क्विंन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेला एक डाव (South Africa vs Zimbabwe) आणि 236 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. याच बरोबरच 0-2 अशा फरकाने मालिकाही गमवावी लागली. शेवटच्या सामन्या दरम्यान झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी असे एक कृत्य केले ज्यावर आयसीसीने (ICC) कठोर कारवाई केली आहे.

झिम्बाब्वेच्या गोलंदाजावर कारवाई

झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज कुंदाई मातिगिमूला (Kundai Matigimu) अयोग्य आणि धोकादायक वर्तणुकीसाठी सामना शुल्काच्या 15 टक्के आर्थिक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याचबरोबर त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला. ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 72 व्या ओव्हरमध्ये झाली. यावेळी मातिगिमुने आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केले आणि आफ्रिकेचा फलंदाज लुआन द्रे प्रिटोरियसच्या मनगटावर अगदी जवळून चेंडू फेकला. या प्रकारावर क्रिकेट जगतातून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच या गोलंदाजावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

फक्त अडीच दिवसांत मॅच संपली! कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा धुव्वा; इंग्लंडचा दणदणीत विजय

सामन्याच्या पहिल्याच दिवशी 72 व्या ओव्हरमध्ये मातिगिमुने चेंडू आपल्या फॉलो थ्रूमध्ये अडवला. नंतर रागाच्या भरात चेंडू फलंदाजाच्या दिशेने फेकला. हा चेंडू आफ्रिकेचा फलंदाज प्रिटोरियस याच्या मनगटाला लागला. या प्रकरणाची आयसीसीने गंभीर दखल घेतली. आयसीसी आचारसंहितेतील अनुच्छेद 2.9 चे उल्लंघन म्हणून या प्रकाराची नोंद करण्यात आली.

कुंदाई मातिगिमूला चूक मान्य

यानंतर मातिगिमूने आपली चूक मान्य केली आहे. सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी दिलेली शिक्षा स्वीकार केली आहे. मागील दोन वर्षात ही मातिगिमूचा पहिलीच चूक आहे. या कारणामुळे त्याला एक डिमेरिट गुण देण्यात आला. चेंडू लागल्याने प्रिटोरियसला काही गंभीर दुखापत झाली नाही मात्र त्याला मैदानावर फिल्डिंग करता आली नाही.

ZIM vs AFG: झिम्बाब्वेने दिला अफगाणिस्तानला धक्का, पाच वर्षानंतर T20I मध्ये केला पराभव

follow us