Download App

Rohit Sharma : देशांतर्गत क्रिकेट प्रत्येकाला खेळावं लागेल, रोहितकडून इशान-श्रेयसची कानउघडणी

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने Rohit Sharma देशांतर्गत क्रिकेटबद्दल पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. देशांतर्गत क्रिकेट हे मूळ आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येकाला देशांतर्गत क्रिकेट (domestic cricket)हे खेळावंच लागेल असा थेट इशाराच रोहित पवार यांनी दिला आहे. प्रत्येक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळावं, असंही तो म्हणाला. प्रत्येक क्रिकेटपटूनं देशांतर्गत क्रिकेटवर आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचंही यावेळी रोहित शर्मानं सांगितलं. एकप्रकारे कर्णधार रोहित शर्मानं इशान किशन (Ishan Kishan )आणि श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer)कानउघडणीच केली आहे.

44 वर्षांनंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाकडून चूक मान्य, माजी पंतप्रधानांना फाशी देणं अयोग्यच

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसलेल्या प्रत्येक क्रिकेटपटूला देशांतर्गत क्रिकेट खेळावंच लागणार आहे. याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काटक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता कर्णधार रोहित शर्मानेही त्याच मुद्द्यावरुन भारतीय क्रिकेटपटूंना थेट इशारा दिला आहे. रोहित शर्माने धर्मशाळामध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तो बोलत होता.

Pune News : माजी उपमहापौरांनी सोडवलं पुणे काँग्रेसचं टेन्शन; दिला सुपर फॉर्म्युला

बीसीसीआयनं नुकतीच काही दिवसांपूर्वी आगामी हंगामासाठी केंद्रीय करार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्याबद्दल क्रिकेट बोर्डाने कठोर निर्णय घेतला. या दोन्ही खेळाडूंना कराराच्या यादीतून वगळलं आहे.

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले नव्हते. त्यामुळेच बीसीसीआयने कारवाई करत दोन्ही खेळाडूंना करार यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे राष्ट्रीय कराराचा भाग नसल्याचं बीसीसीआयनं आपल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याचबरोबर सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व द्यावंच लागणार, असंही सांगण्यात आलं होतं.

पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटचं महत्व अधोरेखित केलं. रोहितनं सांगितलं की, जेव्हा खेळाडू उपलब्ध असेल तेव्हा त्यानं देशांतर्गत क्रिकेट खेळावं. खेळाडूला वैद्यकीय पथकाकडून काही सल्ला मिळाला असेल तरच त्याने विश्रांती घ्यावी. हे काही क्रिकेटपटूंसाठी नाही तर प्रत्येक क्रिकेटपटूसाठी महत्वाचं आहे. देशांतर्गत क्रिकेटला आपण महत्त्व देणं गरजेचंच आहे, कारण हा भारतीय क्रिकेटचं मूळ आहे.

follow us