SA vs BAN 2nd Test : दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या (SA vs BAN) कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशचा (Bangladesh) पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने कसोटी मालिकाही (South Africa) जिंकली. दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने एक डाव आणि २७३ धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने आशिया खंडात तब्बल दहा वर्षांनंतर कसोटी मालिकेत विजय मिळवला. याआधी सन २०१४ मध्ये कसोटी मालिकेत आफ्रिकेने विजय मिळवला होता. त्यानंतर आज पुन्हा अशी संधी साधता आली.
दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ५७५ धावांवर आफ्रिकेने डाव घोषित केला. या दरम्यान टोनी जॉर्जीने १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १७७ धावा केल्या. तसेच ट्रिस्टन स्टब्सने ६ चौकार आणि ३ षटकार लगावत १०६ धावा केल्या. सात नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या मुलडरने सुद्धा शतक ठोकले. मुलडरने ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. आठ नंबरवरील फलंदाज सेनुरान मुथुसामीने ५ चौकार आणि २ षटकार लगावत ६८ धावा केल्या.
T20 world cup 2024: अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका; आजपासून रंगणार सुपर-8 चा थरार
यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशचे फलंदाज आफ्रिकेच्या गोलंदाज समोर अक्षरशः ढेपाळले. फक्त १५९ धावांवरच संघ ऑलआऊट झाला. या डावात वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने पाच विकेट घेतल्या. आफ्रिकेने फॉलो ऑन देत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी बांग्लादेशला आमंत्रित केलं. नंतर दुसऱ्या डावातही बांग्लादेशचे फलंदाज अपयशी ठरले. दुसऱ्या डावात बांग्लादेशला कशातरी १४३ धावा करता आल्या. यावेळी लेग स्पिनर केशव महाराजने पाच विकेट्स घेतल्या. तसेच सेनुरान मुथूसामीनेही चार विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे आफ्रिकेने एक डाव आणि २७३ धावांनी बांग्लादेशवर मात केली.