Free Entry For Children : क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. लहानांपासून अगदी वृद्धापर्यंत प्रत्येक जण क्रिकेटचा चाहता आहे. आशियाई देशांत क्रिकेटचे सामन्यांवेळी स्टेडियम गर्दीने खचाखच भरलेलं असतं. लोक हजारो रुपये खर्च करून क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी करतात. यात बच्चे कंपनीही असतेच. आता याच बच्चे कंपनीसाठी गुडन्यूज आहे. लहान मुलांना कसोटी सामने पाहण्यासाठी पैशांची आवश्यकता राहणार नाही. कसोटी क्रिकेटचे सामने लहान मुलांना फ्री मध्ये पाहता येतील. वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाच्या सीईओंनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
क्रिकेट वेस्टइंडिजने म्हटलं आहे की वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया (WI vs AUS) यांच्यातील आगामी कसोटी मालिकेत स्टेडियममध्ये मुलांना एन्ट्री फ्री राहील. ही कसोटी मालिका पुढील महिन्यात होणार आहे. या मालिकेत बार्बाडोसमधील केसिंग्टन ओवल, ग्रेनेडातील नॅशनल स्टेडियम आणि जमैकातील सबीन पार्क येथे सामने होणार आहेत. या सर्व सामन्यांत लहान मुलांना एन्ट्री मोफत राहणार आहे.
बीसीसीआयनेच केलं विराटला आऊट?; कसोटी निवृत्तीनंतरच्या अहवालाने खळबळ
कसोटी मालिकेची सुरुवात येत्या 25 जूनपासून होणार आहे. दुसरा सामना 3 जुलै आणि तिसरा सामना 12 जुलैपासून सुरू होणार आहे. वनडे आणि टी 20 च्या तुलनेत कसोटी क्रिकेट कमी लोकप्रिय आहे. एक कसोटी सामना पाच दिवस चालतो. त्यामुळे सामना प्रेक्षकांना रटाळवाणा वाटतो. आता टी 20 ची क्रेझ आहे त्यामुळे कसोटी क्रिकेटचा उरलासुरला प्रेक्षक वर्गही वेगाने कमी होत चालला आहे.
जगात कुठेही कसोटी सामने असोत स्टेडियम रिकामीच असतात. सामने आयोजित करणाऱ्या देशांनाही मोठा फटका बसतो. खरंतर कसोटी क्रिकेटपासून चाहते दुरावत चालले आहेत. याच चाहत्यांना पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात आता लहान मुलांवर भर देण्यात आला आहे. प्रत्येक मुलापर्यंत क्रिकेट पोहोचले पाहिजे हा एक मानवाधिकार आहे असे वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही सांगितलं. वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गोल्डन बॉय नीरज चोप्राला मानाचं पद.. टेरिटोरियल आर्मीत बनला लेफ्टनंट कर्नल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या बक्षीसाच्या रकमेची (World Test Championship) घोषणा झाली आहे. फायनल सामना 11 ते 15 जून दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यावेळी विजेता होणाऱ्या संघासाठी बक्षिसाच्या रकमेची घोषणा झाली आहे. यावेळची रक्कम मागील वेळच्या तुलनेत 125 टक्क्यांनी जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या टीमला तब्बल 30 कोटी 8 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.