cricketer rinku singh and mp priya saroj of up will get stuck in marriage
Cricketer Rinku Singh : भारतीय संघातील (Team India) स्फोटक फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) व यूपीमधील खासदार हे लग्न बंधनात अडकणार आहेत. रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज (MP Priya Saroj) यांचा साखरपुडा झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर खासदार प्रिया सरोज यांचे वडिल आमदार तुफानी सरोज (Rinku Singh) यांनी खरी माहिती दिली आहे. माझ्या मुलीचा व रिंकू सिंग यांचा साखरपुडा झालेला नाही. साखरपुडा झाल्याची खोटी बातमी पसरली असल्याचे तुफानी सरोज यांनी म्हटले आहे.
Auto Expo 2025 : क्लासिक फिचर्स अन् पावरफुल इंजिनसह देशात आली पहिली सीएनजी स्कूटर
तर रिंकू सिंग यांच्या घरच्यांकडून प्रिया यांना मागणी घालण्यात आली असून, आमचे मोठे जावई यांच्याकडे याबाबत रिंकू सिंग यांच्या कुटुंबाने याबाबत चर्चा केली असल्याचे सपाचे आमदार तुफानी सरोज यांनी म्हटले आहे. या नात्याबाबत आम्ही गंभीरपूर्वच विचार करत आहोत. लग्न म्हटले की खूप विचार करून निर्णय घ्यावा लागतो. परंतु दोघांचा साखरपुडा झाली ही बातमी खोटी असल्याचे तुफानी सरोज यांनी म्हटले आहे.
Congratulations to Rinku my Pinku for engagement #WasayHabib #RinkuSingh #BCCI pic.twitter.com/QzRYASk4eH
— Wasay Habib (@wwasay) January 17, 2025
सैफ अली खान हल्ला प्रकरणात मंत्री कदमांचा मोठा खुलासा; म्हणाले, “विरोधी पक्षांनी…”
कोण आहेत प्रिया सरोज ?
प्रिया सरोज या समजावादी पक्षाचे तीन वेळा खासदार राहिलेले व आता आमदार राहिलेले तुफानी सरोज यांची मुलगी आहे. प्रिया सरोज यांचा जन्म प्रयागराजमध्ये झालेला आहे. त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयातून कला शाखेतून पदवी घेतली आहे. तर एमीटी विश्वविद्यालयातून वकिलीची डिग्री घेतलेली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केली आहे. 25 वर्षीय प्रिया यांनी समाजवादी पक्षाकडून राजकारणात प्रवेश केला आहे. पहिल्याच प्रयत्नात 2024 ला मछली शहरामधून त्या खासदार झालेल्या आहेत. त्यांचे वडिल येथून 1999-2004 आणि 2009 मध्ये येथून खासदार होते.