IND vs SA: संजू सॅमसनचे अखेर पहिले शतक, रिंकू सिंगची फटकेबाजी, आफ्रिकेसमोर मोठी धावसंख्या

  • Written By: Published:
IND vs SA: संजू सॅमसनचे अखेर पहिले शतक, रिंकू सिंगची फटकेबाजी, आफ्रिकेसमोर मोठी धावसंख्या

Sanju Samson Centurey : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील (IND vs SA ODI Series) तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने शतक झळकविण्याचा पराक्रम केला आहे. त्याचे हे पहिलेच शतक आहे. संजू सॅमसन सातत्याने चर्चेत राहत असते. परंतु संघात आल्यानंतर तो चांगला खेळ करतो. परंतु त्याला मोठी धावसंख्या उभारता येत नाही, असे बोलले जाते. परंतु हा शिक्का अखेर संजू सॅमसनने (Sanju Samson) आज पुसून काढला आहे. त्याने आज 108 धावांची खेळी केली आहे. तर रिंकू सिंगनेही 38 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर 297 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

अग्निवीर योजना तिन्ही दलासाठी धक्का, माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकात मोठे गौप्यस्फोट

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पार्ल बोलँड पार्क येथे सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 296 धावा कुटल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शानदार शतकही झळकविले आहे. तर तिलक वर्माने 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली. तर रिंकू सिंगने पुन्हा एकदा डेथ ओवर्समध्ये आपला खेळ दाखविला. त्याने 38 धावांची खेळी केली आहे.

भाजप एकट्याने निवडणूक लढवणार, आरएसएससोबत गुप्त मंथन; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

रजत पाटीदार आणि साई सुदर्शनने डावाची सुरुवात केली. भारताला 34 धावांवर पहिला झटका बसला. पाटीदार हा 22 धावांवर बाद झाला. साई सुदर्शनही दहा धावांवर बाद झाला. 49 धावसंख्येवरही दोन्ही सलामीवीर तंबूत परतला होता. भारताला तिसरा झटका केएल राहुलच्या रुपात बसला. तो 21 धावांवर बाद झाला. तर चौथा गडी तिलक वर्माच्या रुपात बाद झाला. तर संजू सॅमसन 108 धावांवर बाद झाला. संजूने 114 चेंडूत आपले वनडेमधील पहिले शतक झळकविले आहे. त्यात त्याने 6 चौकार आणि तीन षटकार मारले.


दोघांबरोबर भागिदारी करत संघालाही सावरले

या सामन्यात सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या पूर्वी केवळ दोनच वनडेमध्ये त्याला वरच्या क्रमांकावर खेळता आले आहे. सॅमसनने या संधीचा फायदा घेत कर्णधार केएल राहुलबरोबर तिसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागिदारी केली आहे. संजू सॅमसनला यापूर्वी ऑगस्ट महिन्यात विडिंज दौऱ्यावर शेवटचा एकदिवसीय सामना खेळता आला आहे. त्याने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली होती. त्यानंतर संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. संजूने तिलक वर्माबरोबर चौथ्या गड्यासाठी 116 धावांची भागिदारी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube