अग्निवीर योजना तिन्ही दलासाठी धक्का, माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकात मोठे गौप्यस्फोट

अग्निवीर योजना तिन्ही दलासाठी धक्का, माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकात मोठे गौप्यस्फोट

Agniveer Yojana : माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे (MM Naravane) यांनी अग्निवीर योजनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अग्निवीर योजना (Agniveer Yojana) ही भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी धक्का होती. त्यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ (Four Stars of Destiny) हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

2020 मध्ये टूर ऑफ ड्यूटी योजनेचा प्रस्ताव दिला
जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 31 डिसेंबर 2019 ते 30 एप्रिल 2022 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी त्यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात लिहिले आहे की, 2020 मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना ‘टूर ऑफ ड्यूटी’ योजनेचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये अग्निवीरप्रमाणे काही काळासाठी सैनिक भरती करण्याची सूचना करण्यात आली होती, जी केवळ भारतीय लष्करासाठी होती.

नरवणे यांनी लिहिले की काही काळानंतर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) अग्निवीर योजना लागू केली. लष्कराबरोबरच हवाई दल आणि नौदल जवानांचाही समावेश केला. या योजनेने लष्करापेक्षा हवाई दल आणि नौदलाला सर्वाधिक आश्चर्यचकित केले.

भाजप एकट्याने निवडणूक लढवणार, आरएसएससोबत गुप्त मंथन; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

75 टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम करण्याचा प्रस्ताव
नरवणे यांनी पुस्तकात लिहिले आहे की, अग्निवीर योजनेवर नंतर अनेकदा चर्चा झाली. यामध्ये लष्कराने 75% अग्निवीरांना सेवेत कायम ठेवण्याची आणि 25% अग्निवीरांना निवृत्त करण्याची चर्चा केली होती. लष्कराने जून 2022 मध्ये अग्निवीर योजना कार्यान्वीत केली. परंतु केवळ 25% अग्निवीरांना 15 वर्षे सेवेत ठेवण्याचा आणि 75 टक्के अग्निवीरांना निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जम्मू-कश्मीरमध्ये पुलवामाची पुनरावृत्ती? सेनेचे जवान घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवादी हल्ला

पगार वाढवण्याची शिफारसही केली होती
नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की सरकारने अग्निवीरांचा पगार 20,000 रुपये प्रतिमहिना ठरवला होता. मात्र त्यानंतर लष्कराने त्यांच्या पगारात वाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर लष्कराच्या शिफारशींनंतर पगार 30,000 रुपये करण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube