Download App

Shubman And Sara : शुबमन गिल-सारा तेंडुलकर लंडनमध्ये दिसले एकत्र, पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) लंडनमध्ये एकत्र दिसले

  • Written By: Last Updated:

Shubman Gill-Sara Tendulkar : लंडनमध्ये मंगळवारी (८ जुलै) टीम इंडियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपूट युवराज सिंगने (Yuvraj Singh) कॅन्सर फाउंडेशन YouWeCan साठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) एकत्र दिसले. या दोघांचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले.

हेल्थसेक्टरमधील मोठी डील! मणिपाल हेल्थकडून सह्याद्री हॉस्पिटल्सचे 6,400 कोटींमध्ये अधिग्रहण 

युवराज सिंगने आयोजित केलेल्या पार्टीत ब्रायन लारा, केविन पीटरसन, विराट कोहली सारखे जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात सारा तेंडुलकर देखील उपस्थित होती. ती तिचे वडील सचिन आणि आई अंजली तेंडुलकर यांच्यासोबत दिसली. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल देखील संघासोबत या कार्यक्रमाला उपस्थित होता.

दरम्यान, या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. यामध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडून कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना लोक टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करत आहे. यावेळी सारा तेंडुलकर व्हिडिओ बनवताना दिसली. मात्र, साराने कॅमेरा चालू करेपर्यंत शुबमन गिल तिथून निघून गेला होता. व्हिडिओवरून हे स्पष्ट होते की गिल अन्य खेळाडूंपेक्षा घाईन पुढे चालत होता आणि साराचा कॅमेरा उशिरा चालू झाला. पण, साराने उर्वरित खेळाडूंचा व्हिडिओ बनवला.

धक्कादायक, कॉमेडी किंग कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर अंधाधुंद गोळीबार, व्हिडिओ व्हायरल 

तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणखी एका फोटोमध्ये भारतीय गिल हसताना दिसतोय आणि एक तरुणी त्याच्या समोर बसलेली आहे. ही तरुणी सारा असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, साराने या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. साराने या कार्यक्रमात तिच्या मित्रांसह उपस्थिती लावली होती.

सारा अन् गिलच्या अफेअरच्या चर्चा..

शुबमन गिलचे नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत अनेकदा जोडले गेले आहे. एकेकाळी त्यांच्या अफेअरच्या अफवा खूप चर्चा होत्या. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत असत. तसेच, ते एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटही करत असत. परंतु, शुबमन आणि सारा यांनी या अफवांवर कधीही उघडपणे भाष्य केलं नाही. मात्र, लंडनमधील या पार्टीने पुन्हा एकदा या अफवांना बळकटी दिली आहे.

follow us