Download App

डेव्हिड वॉर्नरने भुवनेश्वरला बघताच केला चरणस्पर्श, नंतर मारली मिठी; व्हिडिओ व्हायरल

  • Written By: Last Updated:

David Warner runs out and falls at Bhuvneshwar’s feet : आयपीएलच्या (IPL) १६ व्या सिझनमधील ३४ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हे दोन तगडे संघ आमने-सामने आले होते. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सात धावांनी रोमांचक विजय मिळवला. या विजयाचे श्रेय डेव्हिडने त्याचे फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना दिले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने सनरायझर्सला ६ बाद १३७ धावांवर रोखल्यानंतर ९ बाद १४४ धावा केल्या. दिल्लीसाठी अक्षरने चार षटकांत २१ धावांत दोन बळी तर कुलदीपने याच षटकात २२ धावांत एक विकेट घेतल्याने हैदराबादच्या अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान, या सामन्यापूर्वी कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे क्रिकेटप्रेमींना एक आगळं-वेगळंच रूप पाहायला मिळालं, ज्याने प्रेक्षक थक्क झाले. या घटनेचा एक व्हिडिओदेखील आता समोर आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आयपीएल 2022 पर्यंत, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघंही एकाच संघाचे प्रतिनिधित्व करत होते. हे दोघेही सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत होते. त्यानंतर 2023 हंगामाच्या लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर संघातून मुक्त केले. पण, भुवनेश्वर कुमारला कायम ठेवण्यात आलं. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला आपल्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी विकत घेतले.

‘या’ मान्यवरांना मिळाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पाहा क्षणचित्रे

वॉर्नर आणि भुवनेश्वर दोन्ही सध्या वेगवेगळ्या संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत, असं असूनही त्यांची मैत्री अजूनही पुर्वीसारखीच घट्ट आहे. त्याची प्रचिती कालच्या सामन्या दरम्यान आली. कालचा सामना डेव्हिड वॉर्नरसाठी अगदी खास होता. कारण, त्याने गेली काही वर्ष ज्या संघाचं नेतृत्व केलं. त्याचं संघाविरुध्द खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. दरम्यान, आपल्या जुना सहकारी भुवनेश्वरला पाहून नतमस्तक झाला.

https://twitter.com/ak_ms_vk_pnn/status/1650530352497332226?s=20

खरंतर डेव्हिड वॉर्नरची भारताशी असलेली ओढ कोणापासून लपून राहिलेली नाही. त्याला भारतीय चित्रपट, खाद्यपदार्थ खूप आवडतात. अनेकदा दक्षिण भारतीय गाण्यांवर तो टिकटॉक व्हिडिओ देखील बनवायचा. त्याला भारतीय लोकांविषयी देखील प्रचंड प्रेम आणि आदर आहे, हे त्यानं काल दाखवून दिलं. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने आपला गुरू आणि एकेकाळचा सहकारी असलेल्या भुवनेश्वर कुमार यांच्या चरणांना स्पर्श करून त्याचे आशीर्वाद घेतले. या व्हायरल व्हिडिओत दिसतं की, सामन्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने जेव्हा भुवनेशनर कुमारला पाहिले, तेव्हा तो त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या भुवनेशनरकडे धावत गेला. आणि त्याच्या पाया पडला, त्यानंतर भुवीने देखील लगेचच वॉर्नरला मिठी मारली. त्याच्या शेजारी उभा असलेला इशांत शर्मा हसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Tags

follow us