DC vs CSK : प्लेऑफसाठी चेन्नईची दिल्लीशी लढत,कोण जिंकणार? थोड्या वेळात नाणेफेक

DC vs CSK : IPL 2023 मध्ये आज सुपर सॅटरडे आहे. म्हणजेच आज दोन सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने असतील. हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी चेन्नईच्या घरच्या मैदानावर हे दोन संघ आमनेसामने […]

WhatsApp Image 2023 05 20 At 2.10.37 PM

WhatsApp Image 2023 05 20 At 2.10.37 PM

DC vs CSK : IPL 2023 मध्ये आज सुपर सॅटरडे आहे. म्हणजेच आज दोन सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने असतील. हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी चेन्नईच्या घरच्या मैदानावर हे दोन संघ आमनेसामने होते तेव्हा चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला होता.

हा सामना जिंकणे चेन्नई सुपर किंग्जसाठी खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक, चेन्नईचा संघ 15 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, थेट प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी एमएस धोनीच्या संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, चेन्नईचा संघ हा सामना हरला तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणार नाही. मात्र त्याला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आतापर्यंत 28 वेळा भिडले आहेत. या दरम्यान चेन्नईने 18 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी दिल्लीने केवळ 10 सामन्यांत विजय मिळवला आहे.

कोण जिंकेल ते जाणून घ्या

चेन्नई आणि दिल्ली यांच्यात चेन्नईचा संघ मजबूत मानलाजातो. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये दिल्लीचा संघ ज्या प्रकारे खेळला आहे, ते पाहता तो चेन्नईचा खेळ खराब करू शकतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

IPL : एक विजय अन् एक पराभव… : मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी RCB च्या भरवश्यावर

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), रिले रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नोरखिया, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तिक्ष्णा.

Exit mobile version