IPL : एक विजय अन् एक पराभव… : मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी RCB च्या भरवश्यावर

  • Written By: Published:
IPL : एक विजय अन् एक पराभव… : मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी RCB च्या भरवश्यावर

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या आयपीएल 2023 मधील प्लेऑफच्या आशा अद्याप जिवंत आहेत. मात्र यासाठी त्यांना त्यांचा सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावाच लागणार आहे. तसंच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्याच्या निकालावरही मुंबईचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या सामन्याचा निकालच मुंबईला प्लेऑफच तिकिट मिळणार की नाही हे ठरविणार आहे. (Mumbai Indians are the most successful team in IPL history. But now the playoff ticket in IPL 16th season is still not certain.)

मुंबईने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 13 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई 14 पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी आरसीबीनेही 13 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. मात्र नेट रनरेट मुंबईपेक्षा सरस असल्याने 14 पॉइंट्ससह आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. याचमुळे मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे भवितव्य हे आता आरसीबीच्या हाती असणार आहे.

IPL 2023: टीव्हीवर सर्वाधिक पाहिलेल्या सामन्यांमध्ये चेन्नई टॉपवर

असं आहे समीकरण :

मुंबईला यापूर्वीच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे आता सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावाच लागणार आहे. तसंच गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला तरच मुंबईला प्लेऑफच तिकिट मिळू शकणार आहे. जर हैदराबाद विरुद्धचा सामना मुंबईने जिंकला आणि गुजरातविरुद्धचा सामना आरसीबीने जिंकला तर मुंबईचा आयपीएलमधील यंदाचा प्रवास संपुष्टात येऊन आरसीबी फायनलमध्ये प्रवेश करेल. याशिवाय जरी हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा अन् गुजरातविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला तरीही आरसीबी नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

Virat Kohli IPL 2023 Records : कोहलीच्या तुफानी खेळीने आयपीएलमध्ये रचला मोठा विक्रम

अशी आहे मुंबईची पलटण :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube