Dipti Jivanji Won Gold in World Para Athletics Championship by World Record : आज ( 20 मे) ला जापानमधील कोबे या शहरामध्ये जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Para Athletics Championship ) ही स्पर्धा पार पडली. त्यामध्ये भारताच्या दीप्ती जीवनजी ( Dipti Jivanji) या तरुणीने इतिहास रचला आहे.
Pune News : वेदांतचा कारनाम्याचा सर्वांनाच भुर्दंड! कोणालाच सोडणार नाही, पोलिस आयुक्तांचा इशारा
दीप्तीने महिलांच्या 400 मीटर t20 शर्यतीमध्ये केवळ 55.7 एवढ्या कालावधीमध्ये विश्वविक्रम रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तर दीप्तीच्या या यशाने ती आता पॅरिस ऑलिम्पिक नंतर होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकमधील स्पर्धांसाठी पात्र झाली आहे. तसेच तिच्या या कामगिरीमुळे पॅरा जागतिक चॅम्पियनशिपच्या ट्रॅक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली ॲथलेट ठरली आहे.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन; वाचा, नक्की काय घडलं
या स्पर्धेमध्ये दीप्तीने अमेरिकेची खेळाडू ब्रियाना क्लार्कचा 55.12 सेकंद चा विश्वविक्रम मोडला आहे. गेल्या वर्षी ब्रियाना क्लार्कने पॅरिसमध्ये झालेल्या स्पर्धेत 55.12 सेकंडमध्ये हा विक्रम बनवला होता. तर त्यावेळी तुर्कीची एसेल ओंडेर ही खेळाडू 55.19 सेकंड सह दुसऱ्या स्थानावर होती. तरी या अगोदर रविवारी 19 मेला दीप्तीने 56.18 सेकंड एवढ्या कालावधीमध्ये धावत आशिया खंडातील रेकॉर्ड बनवलं होतं. त्यामुळे ती अंतिम फेरीसाठी पात्र झाली होती. त्याचबरोबर आता या विजयानंतर ती पॅरिस ऑलम्पिक 2024 साठी देखील पात्र झाली आहे.