Duleep Trophy final : इशान किशनचे तुफानी शतक; ईस्ट झोनचा धावांचा डोंगर

Duleep Trophy final: कर्णधार इशान किशन (Ishan Kishan) शानदार खेळी केलीय. त्याने साउथ झोनच्या (South Zone) गोलंदाजांची धुलाई करत चौकार, षटकारांचा पाऊस पाडला.

Ishan Kisan

Ishan Kisan

Duleep Trophy final: दुलिप ट्राफीच्या (Duleep Trophy final) फायलनमध्ये ईस्ट झोनचा (East Zone) कर्णधार इशान किशन (Ishan Kishan) शानदार खेळी केलीय. त्याने साउथ झोनच्या (South Zone) गोलंदाजांची धुलाई करत चौकार, षटकारांचा पाऊस पाडत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली आहे. त्याने पहिल्याच दिवशी 122 चेंडूत स्फोटक शतक झळकविले आहे. या खेळीमुळे ईस्ट झोनने 4 विकेट गमावत तब्बल 385 धावांचा डोंगर उभा केला.

नाणेफेक जिंकून प्रथम इशान किशनने फलंदाजीचा निर्णय घेतला. किशन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. श्रेयस गोपालच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत त्याने आपले शतक झळकविले आहे. त्याच्या या आक्रमक खेळीत आतापर्यंत 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.


इशान किशनची शानदार खेळी

ईशान किशनचे हे शतक दुलिप ट्रॉफीच्या इतिहासातील त्याचे दुसरे शतक झळकविले आहे. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याच्या कारकिर्दीतील हे दहावे शतक आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व आणि उपांत्यफेरीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या इशानने अंतिम सामन्यात मात्र आपली सारी कसर भरून काढून शानदार खेळी केली आहे. त्याने आपल्या झारखंडमधील सहकारी फलंदाज कुमार कुशाग्रसोबत मिळून पाचव्या विकेटसाठी अवघ्या 146 चेंडूंमध्ये 133 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केलीय. या भागीदारीमुळे ईस्ट झोनने सामन्यावर मजबूत पकड मिळविली आहे.


शिखर मोहनचीही 85 धावांची शानदार खेळी

इशानच्या स्फोटक शतकापूर्वी 21 वर्षीय युवा फलंदाज शिखर मोहननेही आपल्या पदार्पणाच्या सामन्याला खास बनवले. रांचीचा रहिवासी असलेल्या या डावखुऱ्या फलंदाजाला विराट सिंहच्या जागी अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली होती. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. शिखरने 120 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 85 धावांची शानदार खेळी केलीय.

अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशीचेही योगदान
ईस्ट झोनसाठी सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनेही जोरदार सुरुवात करून दिली. त्याने 86 चेंडूंमध्ये 72 धावांची आक्रमक खेळी केली. तर युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीनेही आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. उपांत्य फेरीत चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या वैभवने 44 धावांची खेळी केलीय.

Exit mobile version