Duleep Trophy final : इशान किशनचे धुव्वाधार द्विशतक; अंशुमन गायकवाडांचा विक्रम मोडला
Ishan Kishan : शेवटी 301 चेंडूंत 250 धावांवर किशन हा रिटायर्ट हर्ट झाला आहे. या द्विशतकाबरोबर इशान किशनने अनेक विक्रमही आपल्या नावावर नोंदविले आहेत.
Ishan Kishan Double Century : दुलिप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy final) सोमवारी एक विक्रम नोंदविला गेलाय. पूर्व विभागाचा ( East Zone) कर्णधार इशान किशनने (Ishan Kishan) धुव्वाधार फलंदाजी करत द्विशतक झळकाविले आहे. शेवटी 301 चेंडूंत 250 धावांवर किशन हा रिटायर्ट हर्ट झाला आहे. या द्विशतकाबरोबर इशान किशनने अनेक विक्रमही आपल्या नावावर नोंदविले आहेत. या स्पर्धेतील अरुण लाल, सबा करीम व अंशुम गायकवाड यांनी द्विशतके झळकविण्याचा विक्रम केला होता. या विक्रमही इशान किशनने मोडला आहे.
देवाच्या दारात उलगडणार रहस्याचा खेळ… ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर प्रदर्शित…
इशान किशनने दक्षिण विभागाची (South Zone) गोलंदाजी अक्षरश: फोडून काढलीय. इशान किशनने या खेळीत 27 चौकार आणि सात षटकारांचा पाऊस पाडला आहे. इशानने 270 चेंडूंत द्विशतक झळकविले आहे. तर दक्षिण विभागाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दोन दिवसांत एकही विकेट घेता आलेली नाही. 250 धावांवर पोहोचल्यानंतर इशानला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले.
बारामतीचं राजकारण तापलं; भाजपची ताकद, NCP चे डावपेच…युगेंद्र पवार काय म्हणाले?
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील इशानचे दुसरे द्विशतक
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील इशान किशनचे हे दुसरे द्विशतक आहे. 2016-17 च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने दिल्लीविरुद्ध 273 धावांची शानदार खेळी केली होती. दुलिप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पूर्णविभागाकडून कर्णधार म्हणून इशान पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. टॉप ऑर्डरने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. तसेच खेळपट्टीवर गोलंदाजांना फारशी मदत मिळत नव्हती. याचा इशानने पुरेपूर फायदा घेतला. अवघ्या 122 चेंडूंत त्याने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील दहावे शतक पूर्ण केले.
That moment when Ishan Kishan reached 2️⃣5️⃣0️⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/KQf5Km69nk#DuleepTrophy | #SZvEZ pic.twitter.com/6YJYiwNtjV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 7, 2026
फायनलमध्ये द्विशतक करणारा दुसरा कर्णधार
झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा बिहारच्या इशान किशन दुलिप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा केवळ दुसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी 1987 मध्ये अंशुमान गायकवाड यांनी अंतिम सामन्यात 216 धावांची खेळी केली होती. या ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक करणारा इशान सहावा फलंदाज ठरला आहे. अरुण लाल आणि सबा करीम यांच्यानंतर इस्ट झोनसाठी 200 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
इशानने देशासाठी केवळ दोन कसोटी खेळला
28 वर्षीय ईशान किशन गेल्या काही काळापासून भारतीय कसोटी संघापासून दूर आहे. 2023 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले होते. या दोन सामन्यांतील तीन डावांत त्याने 78 धावा केल्या होत्या. त्यात एका अर्धशतकाचाही समावेश होता. 2024 च्या सुरुवातीला झालेल्या वादानंतर इशान बराच काळ टीम इंडियापासून दूर राहिला. मात्र, त्याचे टी-20 आणि वनडे संघात पुनरागमन झाले आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषकात तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता.