Download App

Emerging Asia Cup 2024 मध्ये भारताने UAE चा सात विकेटने उडवला धुव्वा, अभिषेक शर्मा ठरला हिरो!

Emerging Asia Cup 2024 : इमर्जिंग आशिया चषक 2024 च्या आठव्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत संयुक्त अरब अमिराती (UAE) चा

  • Written By: Last Updated:

Emerging Asia Cup 2024 : इमर्जिंग आशिया चषक 2024 च्या (Emerging Asia Cup 2024) आठव्या सामन्यात भारतीय संघाने (Team India) दमदार कामगिरी करत संयुक्त अरब अमिराती (UAE) चा सात विकेटने पराभव केला आहे.  या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 108 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

भारताकडून अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत भारताचा विजय निश्चित केला अभिषेकने 24 चेंडूमध्ये 58 धावांची खेळी केली तर या सामन्यात कर्णधार टिळक वर्माने (Tilak Verma) 21 धावा केल्या. शेवटी आयुष बडोनीने (Ayush Badoni) एक षटकार आणि एक चौकार मारून भारताला या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवून दिला.

108 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली प्रभसिमरन सिंगने (8) पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. यानंतर अभिषेकने कर्णधार टिळक वर्मा (18 चेंडूत 21) सोबत भागीदारी करत भारतीय संघाचा विजय निश्चित केला मात्र आठव्या षटकात टिळक वर्मा तर नवव्या षटकात अभिषेक शर्मा बाद झाला.

अभिषेकने 24 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. त्यानंतर नेहल वढेरा 6 धावा करून नाबाद राहिला आणि आयुष बडोनी 12 धावा करून नाबाद राहिला.

यूएईकडून राहुल चोप्राने अर्धशतक झळकावले. त्याने 50 चेंडूंत 50 धावांची खेळी खेळली, ज्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर कर्णधार बासिल हमीदने 22 आणि मयंक राजेश कुमारने 10 धावा केले. भारताकडून रसीख दार सलामने शानदार गोलंदाजी करत तीन विकेट घेतले तर रमणदीप सिंगने दोन, अंशुल कंबोज, वैभव अरोरा आणि नेहल वढेरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टिळक वर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 7 धावांनी पराभव केला होता.

मोठी बातमी! ‘परिवर्तन महाशक्ती’ कडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिरोळ, मिरज स्वाभिमानीसाठी 

follow us