Joe Root Test Record: रूटने मोडला सचिनचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

Joe Root Test Record: सध्या इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने 11,000 कसोटी धावांचा टप्पा पार केला आहे. हा आकडा गाठणारा जो रूट हा दुसरा इंग्लिश खेळाडू ठरला. माजी इंग्लिश खेळाडू अॅलिस्टर कुकने या आकड्याला पहिल्यांदा स्पर्श केला. दुसरीकडे, जो रूटने 11 हजार […]

WhatsApp Image 2023 06 03 At 3.46.30 PM

WhatsApp Image 2023 06 03 At 3.46.30 PM

Joe Root Test Record: सध्या इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने 11,000 कसोटी धावांचा टप्पा पार केला आहे. हा आकडा गाठणारा जो रूट हा दुसरा इंग्लिश खेळाडू ठरला. माजी इंग्लिश खेळाडू अॅलिस्टर कुकने या आकड्याला पहिल्यांदा स्पर्श केला. दुसरीकडे, जो रूटने 11 हजार धावांचा टप्पा पार करत भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला आहे.

वास्तविक, जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने दिग्गज सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. रूटने वयाच्या 32 वर्षे 154 दिवसांत हा टप्पा पार केला, तर सचिन तेंडुलकरने वयाच्या 34 वर्षे 95 दिवसांत 11,000 कसोटी धावांचा टप्पा पार केला. त्याचबरोबर या बाबतीत अॅलिस्टर कुक पहिल्या क्रमांकावर आहे. कूकने वयाच्या 31 वर्षे 357 दिवसांत हा कसोटी आकडा गाठला.

Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच

रुट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा 11 वा खेळाडू

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जो रूट हा 11वा खेळाडू आहे. रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज स्टीव्ह वॉला माघे टाकले आहे. स्टीव्ह वॉने आपल्या कारकिर्दीत 10,927 कसोटी धावा केल्या. त्याचवेळी, कमी डावात 11,000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत रुटने अॅलिस्टर कूकला मागे टाकले आहे. रूटने 238 डावांत हा आकडा गाठला. तर अॅलिस्टर कूकला हा आकडा गाठण्यासाठी 252 डाव खेळावे लागले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11,000 धावा करणारा खेळाडू

कुमार संगकारा – 208 डावात.
ब्रायन लारा – 213 डावात.
रिकी पाँटिंग – 222 डावात.
सचिन तेंडुलकर – 223 डावात.
राहुल द्रविड – 234 डावात.
जॅक कॅलिस 234 डावात.
महिला जयवर्धने – 237 डावात.
जो रूट – 238 डावात.
अॅलिस्टर कूक – 252 डावात
शिवनारायण चंद्रपॉल – 256 डावात.
अॅलन बॉर्डर – 259 डावात.

Exit mobile version