Eng vs Pak : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप; दोन स्टार खेळाडू मायदेशी परतणार अन् मुख्य प्रशिक्षकही बदलणार

Eng vs Pak : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असणाऱ्या तीन कसोटी सामन्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील पाकिस्तानचा पराभव

Eng Vs Pak

Eng Vs Pak

Eng vs Pak : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असणाऱ्या तीन कसोटी सामन्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील पाकिस्तानचा पराभव झाल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या भूकंप आला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान संघातील दोन स्टार खेळाडू परत मायदेशी परतणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर पीसीबीची बैठकीत मोहम्मद रिझवान आणि सलामीवीर इमाम-उल-हक यांच्यावर मोठा निर्णय घेत दोघांना मायदेशी परत बोलावण्याची शक्यता आहे. पाकिस्तान लीड्स येथील पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून एका डावाने आणि 103 धावांनी पराभव झाला होता तर लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानचा 194 धावांनी पराभव केला.

पीसीबीची उच्चस्तरीय बैठक

‘जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, रिझवान (Mohammad Rizwan) आणि इमाम (Imam-ul-Haq) यांना परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली असून या बैठकीला पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी, मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) सुमेर अहमद, पाकिस्तान सुपर लीग (PSL) चे सीईओ सलमान नसीर, माजी क्रिकेटपटू आणि वरिष्ठ निवड समिती सदस्य आकिब जावेद तसेच व्हाईट-बॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते.

पीसीबीच्या सूत्राने सांगितले की, मोहसिन नक्वी जे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रीही आहेत यांना इंग्लंडमधील पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीबाबत वरिष्ठ स्तरावरील नाराजी आणि निराशा याबद्दल अवगत करण्यात आले आहे. सूत्राने सांगितले, दुसऱ्या कसोटीदरम्यान ‘स्काय स्पोर्ट्स’वर इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत प्रसारित झाल्याच्या घटनेबाबतही उच्च स्तरावर नाराजी आहे. तरीही, प्रसारमाध्यमांमध्ये पाकिस्तान संघाची निर्माण होणारी प्रतिमा आणि त्यांची मैदानातील कामगिरी ही मुख्य चिंतेची बाब आहे. मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हक दोघेही मायदेशी परतत असल्याचा दावा या सूत्राने केला.

सरफराजच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

या कसोटी सामन्यानंतर इमाम गंभीर अडचणीत आहे. पाकिस्तानसाठी दोन कसोटी सामने खेळलेला 23 वर्षीय अब्दुल्ला फझल याला इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना इमामला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला फलंदाजीसाठी येता आले नाही मात्र, त्याच्या दुखापतीच्या गांभीर्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताओ प्रोग्रॅम ; CM फडणवीसांचा हल्लाबोल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत कसोटी संघाची जबाबदारी माईक हेसन यांच्याकडे सोपवण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. हेसन आता इंग्लंड दौऱ्याच्या उर्वरित कालावधीसाठी पाकिस्तानच्या संघासोबतच राहणार आहेत. कसोटी संघासोबतच्या त्यांच्या या उपस्थितीमुळे पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांच्या भविष्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Exit mobile version