ENG vs AUS 4th ODI Highlights : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात (AUS vs ENG) असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत काल इंग्लंडने कांगारूंना चांगलेच धुतले. चौथ्या सामन्यात इंग्लिश खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा तब्बल (Australia) 186 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंडने (Team England) मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आता मालिकेतील अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यात विजयी ठरणारा संघ मालिकाही जिंकणार आहे.
या मालिकेआधी दोन्ही संघात तीन टी 20 सामन्यांची सिरीज झाली होती. या मालिकेतील पहिल्याा सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. तिसरा सामना पावसाच्या (Heavy Rain) व्यत्ययामुळे रद्द करावा लागला होता. सिरीज 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. आता एकदिवसीय मालिकेतही याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत.
एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यात पावसाचा अडथळा आला होता. यामुळे ओव्हर्स कमी करण्यात आल्या. याआधीचा सामना तर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे इंग्लंडने जिंकला होता. आता या मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (29 सप्टेंबर) होणार आहे.
ENG vs AUS: ओव्हल कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांवर आटोपला, मिचेल स्टार्कने घेतल्या 4 विकेट
चौथ्या सामन्यात इंग्लंडचे वर्चस्व राहिले. या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे सामना 39 ओव्हर्सचा करण्यात आला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. इंग्लंडने 39 ओव्हर्समध्ये 312 धावा केल्या. कर्णधार हॅरी ब्रुकने (Harry Brook) 87 धावा केल्या. बेन डकेटने धुवाधार 63 धावा केल्या. लियाम लिविंगस्टोनने फक्त 27 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 229.63 इतका जबरदस्त राहिला.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेले ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पुरते ढेपाळले. 24.4 ओव्हर्समध्येच 126 धावांवर इंग्लंडने हा सामना तब्बल 186 धावांनी जिंकला. इतक्या मोठ्या फरकाने सामना गमावण्याची नामुष्की ऑस्ट्रेलियावर ओढवली. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) 34 धावा केल्या. इंग्लंडचा गोलंदाज मॅथ्यू पॉट्सने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. ब्रायडन कार्सनेही तीन विकेट घेतल्या. तसेच जोफ्रा आर्चरने दोन आणि आदिल रशीदने एक विकेट घेत संघाच्या विजयात हातभार लावला.
ENG vs AUS: ओव्हल कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांवर आटोपला, मिचेल स्टार्कने घेतल्या 4 विकेट