फक्त एक चूक महागात पडली, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव; सूर्यकु्मारचा खुलासा..

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला.

Surya Kumar Yadav

Surya Kumar Yadav

IND vs ENG 3rd T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 26 धावांनी पराभव केला. एका चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला सामना गमवावा लागला अशी प्रतिक्रिया कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दिली.

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सूर्यकु्मारला वाटलं की काही काळानंतर दव पडेल त्यामुळे नंतर फलंदाजी करणे सोपे होईल परंतु, त्याला जे वाटलं होतं तसं काही घडलं नाही. हार्दिक आणि अक्षर पटेल ज्यावेळी फलंदाजी करत होते तेव्हा सामना आमच्या हातात होता. पण, आदिल रशीदला क्रेडिट द्यावंच लागेल. त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने आमच्या फलंदाजांना स्ट्राईक रोटेट करण्याची संधी दिली नाही.

Video : कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराहचीच हवा; बँड म्हणाला, तू इंग्लंडची विकेट घेतो मला

टी 20 सामन्यात नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आम्हाला फलंदाजीच्या दृष्टीकोनातून शिकायला मिळालं. ड्रॉइंग बोर्डवर परत जावं लागेल ज्या काही चुका झाल्या आहेत त्यापासून शिकावं लागेल. वरुण अभ्यास सत्रात प्रचंड मेहनत घेत आहे. तो एक अनुशासित खेळाडू आहे आणि त्याने घेतलेल्या मेहनतीचे परिणाम आता दिसू लागले आहेत असे सूर्यकुमार यादव म्हणाला.

दरम्यान, इंग्लंडने तिसरा सामना जिंकला असला तरी आधीचे दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे या मालिकेत भारताची 2-1 अशी आघाडी आहे. आता या मालिकेतील चौथा टी 20 सामना 31 जानेवारीला होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी दोन्ही संघांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर इंग्लंडसाठी हा सामना जास्त महत्वाचा राहणार आहे.

टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात; इंग्लंडचा 57 धावांनी केला पराभव

Exit mobile version