सट्टेबाजीची जाहिरात करणे ब्रँडन मॅकलमच्या आले अंगलट; मुख्य कोच पद जाण्याची शक्यता

Brendon Mccullum :  इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यातील गोंधळ आता वाढला आहे. खरेतर, ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातींमध्ये ब्रँडन मॅकलमची उपस्थिती दिसली होती. यावरुन इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) मॅकलमने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केले की नाही याची तपासणी करत आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅकलम जानेवारीमध्ये बेटिंग ग्रुप 22Bet […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 15T125921.815

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 15T125921.815

Brendon Mccullum :  इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यातील गोंधळ आता वाढला आहे. खरेतर, ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातींमध्ये ब्रँडन मॅकलमची उपस्थिती दिसली होती. यावरुन इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) मॅकलमने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केले की नाही याची तपासणी करत आहे.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅकलम जानेवारीमध्ये बेटिंग ग्रुप 22Bet मध्ये अॅम्बेसेडर म्हणून सामील झाल्यानंतर ऑनलाइन जाहिरातींमध्ये दिसला. त्याने 27 मार्च रोजी त्याच्या Facebook पेजवर इंडियन प्रीमियर लीगचा 22Bet च्या मार्केटचा प्रचार करणारा एक व्हिडिओ देखील शेअर केला.

अमित शाह मुंबईत, पण चंद्रकांत दादा कोल्हापूरात? ‘त्या’ वक्तव्यावरची नाराजी कायम?

यावर, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि ब्रँडनशी त्याच्या 22Bet सोबतच्या संबंधांबद्दल चर्चा केली आहे, असे ईसीबीने बीबीसी या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. ईसीबीने पुढे स्पष्ट केले की, “आमच्याकडे जुगार खेळण्याचे नियम आहेत आणि त्यांचे पालन केले जाईल याची खात्री करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू.” ईसीबीने मात्र मॅकलमशी सध्या कोणतीही चौकशी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

निलेश लंकेचे दारही ईडीने ठोठावले होते…. पण अधिकाऱ्यांनाच….

दरम्यान, न्यूझीलंडच्या प्रॉब्लेम गॅम्बलिंग फाउंडेशनने गेल्या आठवड्यात जाहिरातींबद्दल ECB कडे तक्रार केली. ECB च्या भेदभाव विरोधी संहितेमुळे कोणत्याही सामन्याचा निकाल, प्रगती, आचरण किंवा इतर कोणत्याही पैलूंशी संबंधित कोणत्याही पक्षाला सट्टा लावण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रोत्साहित करणे हा गुन्हा ठरतो.

Exit mobile version