Download App

इंग्लंडला विश्वचषकात मिळाला दुसरा विजय, पॉईट टेबलमध्ये बदल

World Cup 2023: विश्वचषकात (World Cup 2023) सहा पराभव पाहिल्यानंतर इंग्लंडने नेदरलँड्सवर (ENG vs NED) 160 धावांनी विजय मिळवला आहे. मात्र, इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नेदरलँड्ससमोर विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य होते. पण डच संघ 37.2 षटकांत 179 धावांत गारद झाला. अशाप्रकारे जोस बटलरच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या इंग्लंडने हा सामना सहज जिंकला.

नेदरलँड्ससाठी तेजा निदामनुरूने 34 चेंडूत सर्वाधिक 41 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय स्कॉट एडवर्ड्सने 42 चेंडूत 38 धावा केल्या. सिब्रँड एंगलब्रँडने 49 चेंडूत 33 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी नेदरलँड्सच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.

इंग्लंडकडून आदिल रशीद आणि मोईन अलीने 3-3 विकेट घेतल्या. डेव्हिड विलीला 2 विकेट मिळाल्या. याशिवाय ख्रिस वोक्सने 1 विकेट आपल्या नावावर केली.

रश्मिका-कतरिनानंतर आता सारा तेंडुलकरच्या फोटोशी छेडछाड, फोटो व्हायरल

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडने 50 षटकांत 9 गडी गमावून 339 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने शानदार शतक झळकावले. बेन स्टोक्सने 84 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार मारले. डेव्हिड मलानने 74 चेंडूत 87 धावांचे योगदान दिले.

World Cup 2023 : मॅक्सवेल तिसरा ! ‘या’ दोन फलंदाजांचं रेकॉर्ड तुटलंच नाही

त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय ख्रिस वोक्सने 45 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. नेदरलँड्ससाठी बास डी लीडे हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बेस डी लीडेने 3 विकेट घेतल्या. आर्यन दत्त आणि वॉन विक यांना प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वॉन मीकरेनने 1 खेळाडू बाद केला.

इंग्लंडच्या विजयानंतर गुणतालिकेत किती बदल झाला?
या विजयानंतर इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, उपांत्य फेरी गाठण्याच्या इंग्लंडच्या आशा संपल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर नेदरलँड्सही अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या पराभवानंतर नेदरलँड्सची पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.

आतापर्यंत इंग्लंडशिवाय नेदरलँड्स, बांग्लादेश आणि श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत. तर भारताशिवाय दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली आहे.

Tags

follow us