Argentina vs Egypt : 20 मिनिटांत सामना फिरला; अर्जेंटिनाची क्वार्टरफायनलमध्ये एन्ट्री; इजिप्तचा पराभव

Argentina vs Egypt : फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 16 च्या शेवटच्या सामन्यात अर्जेंटिनाने शानदार कामगिरी करत इजिप्तचा 3-2 ने पराभव केला

Argentina Vs Egypt

Argentina Vs Egypt

Argentina vs Egypt : फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 16 च्या शेवटच्या सामन्यात अर्जेंटिनाने शानदार कामगिरी करत इजिप्तचा 3-2 ने पराभव केला आहे. या विजयानंतर अर्जेंटिना या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.  रोमांचक झालेल्या या सामन्यात शेवटच्या 20 मिनिटांत अर्जेंटिनाने इजिप्तचा पराभव केला. अर्जेंटिनाकडून स्टार खेळाडून लिओनेल मेस्सीने शानदार कामगिरी केली.

या सामन्याच्या सुरुवातीपासून इजिप्तने आक्रमक खेळायला सुरुवात केली होती. 15 व्या मिनिटाला पहिला गोल करुन इजिप्तने अर्जेंटिनावर दबाव आणला होता.  यासर इब्राहिमने हा गोल केला. त्यानंतर, 21 व्या मिनिटाला मेस्सीला पेनल्टीद्वारे गोल करण्याची संधी मिळाली होती, पण तो त्यात अपयशी ठरला. त्यानंतर 67 व्या मिनिटाला इजिप्तने दुसरा गोल करत सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. 78 व्या मिनिटापर्यंत इजिप्तकडे 2-0 अशी आघाडी होती.

 

अर्जेंटिनाने पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणला

त्यानंतर आक्रमक खेळ करत अर्जेंटिनाने शानदार पुनरागमन केले. 79 व्या मिनिटाला ख्रिस्टियन रोमेरोने अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. त्यानंतर 83 व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने गोल करत  सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानंतर, स्टॉपेज टाइममध्ये (90+2 मिनिटाला) एन्झो फर्नांडिसने निर्णायक गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने इजिप्तविरुद्ध पराभवाच्या छायेतून बाहेर पडत शानदार पुनरागमन केले आणि उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

राज्यात आजही अतिमुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी-

Exit mobile version