फुटबॉल वर्ल्डकपमध्ये धक्कादायक निकाल ! पॅराग्वेकडून पराभूत होत चार वेळची चॅम्पियन जर्मनी बाहेर

FIFA World Cup 2026 मध्ये सर्वात धक्कादायक निकाल आला आहे. तो म्हणजे चार वेळा विजेता राहिलेला जर्मनी संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026 Shocking result defeat by Paraguay Four-time champions Germany knocked out : जगातील क्रीडा विश्वातील सर्वात मोठा मानला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल. याच फुटबॉलचा फिफा वर्ल्ड कप जगभरात प्रचंड उत्साहात पाहिला जातो. मात्र याच फुटबॉल वर्ल्ड कप 2026 मध्ये आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक निकाल आला आहे. तो म्हणजे चार वेळा विजेता राहिलेला जर्मनी संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

उत्पन्न वाढवा अन्यथा नोकरी गमवा; परिवहन मंत्री सरनाईकांचा एसटीच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

मंगळवारी पहाटे झालेल्या सामन्यामध्ये 42 व्या मिनिटाला पॅराग्वेच्या ज्युलिओ एनकिसोच्या गोलला जर्मनीकडून 54 व्या मिनिटाला काय हावर्ट्स याने उत्तर दिलं. त्यानंतर हा सामना 1-1 असा बरोबरीत आला. त्यानंतर जर्मनीने गोल केला मात्र तो VAR मध्ये नाकारला गेला. त्यामुळे पेनल्टी शूट आउट झालं. त्यातच जर्मनी पराभूत झालं.

अली खामेनींच्या अंत्यसंस्कारला भारत उपस्थित राहणार; PM मोदी नाही, ‘या’ राज्याचे राज्यपाल अन् एक मंत्री जाणार

विशेष म्हणजे चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या या जर्मनीला महत्त्वाच्या पेनल्टी चुकवल्यामुळे 34 व्या क्रमांकावरील पॅराग्वेकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडावे लागलं आहे. त्यामुळे जर्मनी हा संघ उप-32 मधून बाहेर पडणारा या स्पर्धेतील पहिला बलाढ्य संघ ठरला आहे. तर पॅराग्वेने पेनल्टीच्या दोन संधी गमावल्या आणि त्यानंतर होजे कॅनालेने सडन डेथमध्ये गोल केला आणि पॅराग्वेने हा सामना 4-3 (1-1) अशा फरकाने जिंकला.

Exit mobile version