मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL 2023) आजपासून सुरू होत आहे. या लीगच्या पहिल्या सत्रात पहिला सामना आज सायंकाळी ७:३० वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स (MI vs GT) हे संघ आमने- सामने राहणार आहेत. हा सामना मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) होणार आहे. मुंबई इंडियन्सची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती राहणार आहे.
या संघात हेली मॅथ्यूज आणि नताली सीव्हरसारखे दिग्गज खेळाडू असणार आहेत. तर दुसरीकडे, गुजरात जायंट्सचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन विकेटकीपर- फलंदाज बेथ मुनी करत आहे. गुजरात संघात स्नेह राणा, हरलीन देओल आणि अॅशले गार्डनरसारखे मोठे खेळाडू देखील असणार आहेत. अशा परिस्थितीत डब्ल्यूपीएलचा हा पहिला सामना खूपच रोमांचक राहणार आहे.
WPL 2023 चे कसे आहे स्वरूप
WPL च्या पहिल्या सत्रात ५ संघात सहभागी होत आहेत. राउंड रॉबिन सामन्यांतर्गत, प्रत्येक संघ इतर ४ संघांविरुद्ध प्रत्येकी २ सामने खेळवले जाणार आहे. यानंतर, अव्वल क्रमांकावर असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघामध्ये एलिमिनेटर सामना होणार आणि त्याचा विजेता अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ राहणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २६ मार्च रोजी होणार आहे. म्हणजेच २३ दिवसांत एकूण २२ सामने खेळवले जाणार आहे.
इंदूर स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीकडून खराब रेटिंग, म्हणाले…
दोन्ही संघातील खेळाडूंवर एक नजर
मुंबई इंडियन्स महिला: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, यस्तिका भाटिया, अमेलिया केर, अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, प्रियंका बाला, धारा गुजर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिमी बिश्त, सायका इशाक, सोनम यादव.
गुजरात जायंट्स महिला: बेथ मुनी (कर्णधार), स्नेह राणा (उपकर्णधार), अॅशले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, किम गर्थ, शब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर , सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.