इंदूर स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीकडून खराब रेटिंग, म्हणाले…

इंदूर स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीकडून खराब रेटिंग, म्हणाले…

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसांत संपला, मात्र त्यानंतर आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीवर आपली नाराजी दर्शवत या खेळपट्टीला खराब असल्याचा दर्जा दिला आहे. याबाबत आयसीसीने एक निवेदन देखील जारी केले आहे. ICC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही इंदूरच्या खेळपट्टीची तपासणी केली आणि ती खेळण्यायोग्य नसल्याचे आढळले. अशा परिस्थितीत आम्ही त्याला खराब खेळपट्टीचा दर्जा देतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. यामध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे टीम इंडिया सध्या WTC च्या फायनलमध्ये जाण्यापासून मुकली आहे.

याबरोबरच आयसीसीने भारताच्या अडचणी वाढवल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वापरण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत आयसीसीने आपला अहवाल दिला आहे. यामध्ये आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीला खराब रेटिंग गुण दिले आहेत. आयसीसीच्या या निर्णयामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. हा रेटिंग पॉइंट आल्यानंतर भारताला डब्ल्यूटीसीच्या महत्त्वाच्या पॉइंट्समध्येही नुकसान होऊ शकते.

यंदा होळीत अर्पण करा ‘या’ 5 गोष्टी, आर्थिक संकट होईल दूर

इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताला अंतिम फेरीसाठी पात्र ठरायचे असेल तर चौथी आणि शेवटची कसोटी जिंकावी लागेल, अन्यथा 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.

निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, राऊतानंतर अंबादास दानवेही

स्टेडियमला इशारा…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) इंदूरमधील होळकर स्टेडियमला ​​’खराब’ खेळपट्ट्यांच्या श्रेणीत टाकले आहे. वास्तविक, हा एकप्रकारे आयसीसीने होळकर स्टेडियमला ​​दिलेला इशारा आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर होळकर स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनावर बंदी येऊ शकते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube