Download App

इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय घेणार मोठा निर्णय, 35 खेळाडूंना संधी, रोहित शर्मा कर्णधार?

IND vs ENG 2025 :  जून महिन्यात सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून (BCCI) लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मात्र यापूर्वी

  • Written By: Last Updated:

IND vs ENG 2025 :  जून महिन्यात सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून (BCCI) लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मात्र यापूर्वी एक मोठी बातमीसमोर आली आहे. बीसीसीआय या दौऱ्यासाठी 35 खेळाडूंना संधी देण्याचा विचार करत आहे. भारतीय संघाला या दौऱ्यावर  पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) नवीन सायकलचा भाग असणार आहे. सध्या या मालिकेबाबत काही मोठे  अपडेट्स समोर आले आहेत. नवीन अपडेट्सनुसार, या दौऱ्यासाठी 35 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, जे इंग्लंडमध्ये भारतीय संघ आणि भारत अ संघाकडून खेळणार.

रोहित शर्मा कर्णधार

समोर आलेल्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा कर्णधार राहण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्माला बीसीसीआय कर्णधार पदावरुन हटवणार असल्याची माहिती समोर आली होती मात्र आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा कर्णधार राहणार असं सांगण्यात येत आहे.

35 खेळाडूंची निवड

बीसीसीआयने इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि त्यापूर्वी भारत अ दौऱ्यासाठी एकूण 35 खेळाडूंची निवड केली आहे, त्यापैकी बहुतेक सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत आणि काही मायदेशी आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारे करुण नायर आणि रजत पाटीदार यांना इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघात किंवा भारत अ संघात संधी मिळू शकते.

साई सुदर्शन बॅकअप ओपनर

जर रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावर गेला तर त्याचा जोडीदार यशस्वी जयस्वाल सलामीवीर म्हणून असेल, परंतु आता बॅकअप ओपनर अभिमन्यू ईश्वरनऐवजी साई सुदर्शन असू शकतो, जो आयपीएलपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता.

एकाच माणसाला मारू, जो लाखाच्या बरोबरीचा असेल; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पाकिस्तानला धमकी

तर घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त कुलदीप यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकला नाही. यानंतर आता त्याला इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकते.

follow us