Download App

Bob Simpson Passed Away : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार बॉब सिम्पसन यांचे 89 व्या वर्षी निधन

Bob Simpson Passed Away : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक बॉब सिम्पसन (Bob Simpson Passed Away) यांचे वयाच्या 89 व्या

  • Written By: Last Updated:

Bob Simpson Passed Away : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक बॉब सिम्पसन (Bob Simpson Passed Away) यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) याबाबत माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, बॉब सिम्पसन यांंनी ऑस्ट्रेलियाकडून 62 कसोटी सामने खेळले होते. याचबरोबर त्यांनी 41 व्या वर्षी निवृत्तीनंतर परत येऊन ऑस्ट्रेलियन संघाची जबाबदारी स्वीकारली. त्या काळात संघ खूप कमकुवत होता आणि त्यांनी संघाला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर बॉब यांना ऑस्ट्रेलियाने पूर्णवेळ प्रशिक्षक बनवले होते. याशिवाय, बॉब सिम्पसन यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये निवडकर्ता म्हणूनही काम केले.

त्यांच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियाने 1987 चा विश्वचषक, 4 अ‍ॅशेस मालिका (Ashes Series) आणि 1995 मध्ये फ्रँक वॉरेल ट्रॉफी जिंकली होती. तब्बल 17 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजविरुद्ध हा विजय मिळवू शकला होता.

बॉब सिम्पसनची क्रिकेट कारकीर्द

बॉब सिम्पसनने 1957 ते 1978 पर्यंत ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले. या काळात त्यांनी 62 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले. 62 कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करताना बॉबने 4869 धावा केल्या. या काळात त्यांच्या बॅटमधून 10 शतके आणि 27 अर्धशतके आली. याशिवाय बॉबने 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये 36 धावा केल्या.

Income Tax : करदात्यांनो, आयटीआरमध्ये ‘ही’ माहिती द्याच, नाहीतर…

बॉब सिम्पसनच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियाने 1987 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. 1996 च्या विश्वचषकानंतर बॉबने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. 2006 मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले.

follow us