क्रिकेट विश्वातून दुःखद बातमी, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे निधन

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक (Sudhir Naik) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. सुधीर नाईक हे काही दिवसांपूर्वी पडले होते, त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर बुधवारी त्यांचे निधन […]

Untitled Design   2023 04 06T092846.326

Untitled Design 2023 04 06T092846.326

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक (Sudhir Naik) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. सुधीर नाईक हे काही दिवसांपूर्वी पडले होते, त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

सुधीर नाईक यांची भारतासाठी फार मोठी कारकीर्द नसली तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली. आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला रणजी चॅम्पियन बनवणाऱ्या सुधीर यांनी भारतासाठी 3 कसोटी आणि 1 वनडे सामना खेळला. त्यांनी मुंबई क्रिकेटमध्ये प्रशिक्षक आणि क्युरेटरसह विविध भूमिका पार पाडल्या.

रणजी ट्रॉफी विजेते कर्णधार
नाईक हे मुंबई क्रिकेट विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आणि रणजी ट्रॉफी विजेते कर्णधार होते. नाईक यांच्या नेतृत्वाखाली संघाने 1970-71 हंगामात रणजी विजेतेपद पटकावले होते. सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई आणि अशोक मांकड यांसारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय रणजी करंडक जिंकल्यामुळे नाईक यांच्या नेतृत्वाचे खूप कौतुक झाले.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, ‘या’ ठिकाणी घडली घटना

वनडेत भारतासाठी लगावला पहिला चौकार
भारताने 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. या सामन्यात सुधीर नाईक हे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्यासोबत सलामीसाठी उतरले होते. या एकदिवसीय सामन्यात नाईक यांनी भारतासाठी पहिला चौकार मारला होता.

धक्कादायक घटना ! महिलेसह तिच्या दोन मुलांना जिवंत जाळले

नाईक यांनी प्रशिक्षक म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती. भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याच्या कारकिर्दीत त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. नाईक यांनी झहीरला क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत आणले आणि त्याला अनुभव दिला. ते मुंबई निवड समितीचे अध्यक्षही होते. नंतर त्यांनी मुक्त वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर म्हणून काम केले.

Exit mobile version