Sourav Ganguly Picks His Semi-Finalists For ODI World Cup 2023: भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये गांगुलीच्या मते यजमान भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. याशिवाय चौथ्या संघासाठी गांगुलीने न्यूझीलंड किंवा पाकिस्तान यापैकी एक असेल. (former indian skipper sourav ganguly picks his semi finalists for upcoming odi world cup 2023 in india)
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ही माझी पहिली पसंती असल्याचे सौरव गांगुलीने रेव्हस्पोर्ट्झला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही न्यूझीलंड संघाला हलक्यात घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत मी माझ्या उपांत्य फेरीतील 5 संघांचा विचार करेन. मला यात पाकिस्तानचाही समावेश करायचा आहे.
गांगुली पुढे म्हणाला की जर पाकिस्तान पात्र ठरला तर भारतीय चाहत्यांना ईडन गार्डन्स मैदानावर दोन्ही संघांमधील उपांत्य फेरीचा सामना पाहता येईल. जर पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला तर तो मुंबईमध्ये न खेळता कोलकातामध्येच आपला सामना खेळेल.
कथा महाराष्ट्राच्या राजकारणाची अन् षडयंत्र-कट-कारस्थानाची; शरद पवार येणार मोठ्या पडद्यावर
भारतात होत असलेल्या विश्वचषकामुळे खेळाडूंवर थोडे दडपण असू शकते.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीच्या मते, या मेगा स्पर्धेबाबत भारतीय खेळाडूंवर फारसा मानसिक दडपण असणार नाही कारण सर्वच जण खूप मजबूत दिसत आहेत. मात्र, यावेळी ही स्पर्धा घरच्या मैदानावर होत असल्याने कामगिरीचे काही दडपण त्यांच्यावर नक्कीच दिसून येईल.
गांगुली म्हणाला की, तुमच्यावर नेहमीच दबाव असतो. रोहितने गेल्या एकदिवसीय विश्वचषकात 5 शतके झळकावली होती. त्यांच्यावरही दबाव असेल याची मला खात्री आहे. दबाव ही समस्या नाही. मला खात्री आहे की तो यातून मार्ग काढेल. राहुल द्रविड जेव्हा खेळायचा तेव्हा कामगिरीचे दडपण असायचे. आता तो मुख्य प्रशिक्षक असल्याने त्याच्यावर संघाच्या कामगिरीचे दडपण असेल. आम्ही कधीकधी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत नाही. मला वाटतं तो मानसिक दबाव नाही. सर्वजण मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत आणि मला खात्री आहे की यावेळी भारतीय संघ आणखी चांगली कामगिरी करेल.