कथा महाराष्ट्राच्या राजकारणाची अन् षडयंत्र-कट-कारस्थानाची; शरद पवार येणार मोठ्या पडद्यावर

कथा महाराष्ट्राच्या राजकारणाची अन् षडयंत्र-कट-कारस्थानाची; शरद पवार येणार मोठ्या पडद्यावर

Sharad Pawar Movie : अजित पवारांचं राष्ट्रवादीतील बंड, भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे आणि आता थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा करणे. या अशा अनेक मोठ्या उलथा-पालथी सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. याची सुरूवात मात्र गेल्या काही वर्षांपसूनच सुरू आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे वलय आहे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्याभोवती. त्यानंतर आता. याच शरद पवारांवर महाराष्ट्राच्या राजकारणातील षडयंत्र-कट-कारस्थानाची कथा या शीर्षकाखाली चित्रपट येणार आहे. ( Film on Sharad Pawar story of Maharashtra politics Conspiracy by Producer Nilesh Navlakaha )

भारता बाहेरही पसरणार IIT चं जाळं; ‘या’ देशामध्ये होणार पहिला विदेशातील कॅम्पस

मराठीतील प्रसिद्ध असे चित्रपट निर्माते निलेश नवलखा यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी या अगोदर शाळा, फॅंन्ड्री आणि राक्षस यासांरख्या उल्लेखनिय चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर आताा त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील षडयंत्र-कट-कारस्थानाची कथा या शीर्षकाखाली शरद पवारांवर चित्रपट करणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान याबद्दल त्यांनी अनेकदा माध्यमांना बोलले होते. मात्र यावेळी त्यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे.

सभापतीनींच पक्षांतर केले, त्यांच्या पक्षांतर बंदीची सुनावणी कुणासमोर चालणार?

त्यांनी एक ट्विट करत आपल्या या चित्रपटाची घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी या चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो शेअर करत लिहिले की, महाराष्ट्राचे खरे चाणक्य श्री शरद पवार साहेब, आम्ही फक्त त्यांच्या सोबतच… तसेच या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शरद पवारांच्या पावसातील सभेचा फोटो आहे. तसेच ‘चाणक्य’ महाराष्ट्राच्या राजकारणातील षडयंत्र आणि कट-कारस्थानाची कथा असं या चित्रपटाचं शीर्षक आहे.

दरम्यान आपल्या या चित्रपटाविषयी बोलताना नवलखा म्हणाले होते की, त्यांनी हा चित्रपट सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोंडी घडण्याअगोदरच करायचा विचार केला होता. मात्र राज्यातील राजकारणात काहीही शाश्वत नाही. याचा प्रत्यय त्यांना आला. त्यामुळे राजकारणी माझ्यापेक्षा जास्त फास्ट स्क्रिप्ट लिहित असल्याचं त्यांनी म्हटलं. तर आम्ही चित्रपट बनवतो कथा लिहितो. त्यात काही कल्पनाशक्ती तर काही वास्तवाचा पावर करतो. मात्र सध्या राज्यात घडणाऱ्या घडामोडी या कल्पना शक्तीच्याही पलिकडच्या असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube