French Open 2023 Quarter Finals: फ्रेंच ओपनची सुरुवात 28 मेपासून झाली असून यावेळी पुरुषांच्या स्पर्धेचा अंतिम सामना 11 जून रोजी होणार आहे. यावेळी गतविजेता राफेल नदाल हिपच्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होत नाहीये. 2005 मध्ये या स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर, राफेल नदालने भाग न घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यावेळी राफेल नदाल न खेळल्याने सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. याशिवाय जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला कार्लोस अल्कारेझही फ्रेंच ओपन जिंकण्याच्या शर्यतीत आहे. दरम्यान, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला डॅनिल मेददेव हा विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक होता. ब्राझीलचा खेळाडू थियागो साबोथ वाइल्डकडून 5 सेट गमावल्यानंतर तो बाहेर पडला आहे.
फ्रेंच ओपन 2023 उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक
फ्रेंच ओपन 2023 च्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने 6 आणि 7 जून रोजी खेळले जातील. आणि यावेळी उपांत्य फेरीचे सामने 8 आणि जून रोजी होणार आहेत.
या स्पर्धेचा अंतिम सामना फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील रोलँड ग्रॉस स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्ट खात्यात नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला पगार 63,200 रुपये
फ्रेंच ओपनचा उपांत्यपूर्व सामना भारतात कसा पाहू शकता?
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरीचा 2023 सामना भारतात सोनी स्पोर्ट्स टेन 5 आणि सोनी स्पोर्ट्स टेन 2 इंग्लिश, सोनी स्पोर्ट्स टेन 3 (हिंदी) आणि सोनी स्पोर्ट्स टेन 4 (तमिळ आणि तेलुगु) वर थेट प्रसारित केला जाईल.
सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?
फ्रेंच ओपन 2023 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने सोनी लाइव्ह अॅपवर भारतात थेट प्रक्षेपित केले जातील. हे पाहण्यासाठी यूजर्सला 999 रुपयांचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.