दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्ट खात्यात नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला पगार 63,200 रुपये

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्ट खात्यात नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला पगार 63,200 रुपये

Golden opportunity for job in post department for 10th passed candidates : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला वाहन चालवण्याचा अनुभव आणि वाहनातील किरकोळ बिघाड दुरुस्त करण्याचे ज्ञान असेल तर पोस्ट विभागात (Department of Posts) नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. पोस्ट विभाग कर्मचारी कार ड्रायव्हर (Employee car driver) (सामान्य श्रेणी) या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. या पदासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या भरती प्रक्रियेद्वारे स्टाफ कार ड्रायव्हरची (सामान्य श्रेणी) चार पदे भरायची आहेत. या पदावरील नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पोस्ट विभागाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. नियुक्तीचा कालावधी तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती/ अॅब्सॉर्बशन बेसिसवर असेल. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा या बाबतची सविस्तर माहिती या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

पदाचे नाव – स्टॉल कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

एकूण पदे – 4

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पोस्ट विभागाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) या पदासाठी, उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वैध मोटार कार ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवार हा मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार वाहनातील किरकोळ दोष पुन्हा काढण्यास सक्षम) असावा. उमेदवाराला कमीत कमी 3 वर्षे मोटार इअर चालवण्याचा अनुभव असावा आणि उमेदवार हा दहावी पास असावा. महत्वाचं म्हणजे, होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून ३ वर्षांची सेवा दिलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे.

‘ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री’; भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरबाजीवर पटोलेंचे तिरकस उत्तर

वयोमर्यादा
नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार –
स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-2 नुसार मासिक वेतन (19,900 ते 63,200) दिले जाईल.

जाहिरात –
https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_24052023_Eng.pdf

या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार पोस्ट विभागाच्या अधिसूचनेनुसार पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकतात. डाउनलोड केलेला अर्ज तपशीलवार माहितीसह भरा आणि वेबसाइटवर दिलेल्या पत्त्यावर 30 जूनपूर्वी पाठवा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. कारण अर्ज करतांना काही त्रुटी झाल्यास अर्ज रद्द होईल, याची नोंद घ्यावी.

अधिकृत संकेतस्थळ – https://www.indiapost.gov.in/

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube