Download App

IND vs NZ : भारतासमोर 274 धावांचे आव्हान: मोहम्मद शमीने संधीचे केले सोने

IND vs NZ : धर्मशाला येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकात 273 धावा केल्या आहेत. भारताकडून मोहम्मद शमीने घातक गोलंदाजी केली. त्याने पाच फलंदाजांना तंब्बूत पाठवले. कुलदीप यादवे दोन विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने नाबाद 130 धावांची खेळी केली.

टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. मोहम्मद शमीचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला विश्रांती देण्यात आली आहे.

‘EWSचं नवीन पिल्लू आणलं पण मराठ्यांच्या नादाला लागू नका’; जाहिरातीवरुन जरांगे भडकले!

40 षटकांनंतर किवी संघाची धावसंख्या 219 धावा होती, त्यानंतर धावसंख्या 300 च्या पुढे जाईल असे वाटत होते, परंतु अखेरच्या षटकांमध्ये मोहम्मद शमीने सातत्याने विकेट घेत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने 127 चेंडूत 130 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 9 चौकार आणि 5 षटकार आले. याशिवाय रचिन रवींद्रने 75 धावा केल्या.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 बळी घेतले. यादरम्यान त्याने 10 षटकात 54 धावा दिल्या. याशिवाय कुलदीप यादवला दोन विकेट मिळाल्या. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Tags

follow us