‘EWSचं नवीन पिल्लू आणलं पण मराठ्यांच्या नादाला लागू नका’; जाहिरातीवरुन जरांगे भडकले!

‘EWSचं नवीन पिल्लू आणलं पण मराठ्यांच्या नादाला लागू नका’; जाहिरातीवरुन जरांगे भडकले!

Maratha Reservation : ‘EWS चं नवीन पिल्लू आणलं आहे पण तुमच्या हातात दोन दिवस आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका’, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हा इशारा दिला.

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. यासाठी 17 दिवसांचे उपोषण करत त्यांनी शिंदे सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत येत्या 24 ऑक्टोबरला संपणार आहे. ही मुदत संपल्यानंतर 25 तारखेपासून त्यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.

एका बाजूला ही सगळी परिस्थिती असतानाच दुसऱ्या बाजूला शिंदे सरकारने आज (22 ऑक्टोबर) वृत्तपत्रांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची एक शासकीय जाहिरात प्रकाशित केली आहे. यात या आरक्षणाचा सर्वात जास्त लाभ मराठा समाजालाच झाला आहे, असं म्हणतं “शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा”, असा संदेश देण्यात आला आहे. यावरुनच मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, असे राज्य सरकारला या जाहिरातीतून सुचवायचे आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

जरांगे पाटील पुन्हा आक्रमक ; 24 ऑक्टोबरपासून ना अन्न ना पाणी!

या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण हे पिल्लू आणलं असल्याची टीका केली. सरकारने आम्हाला वेडं समजू नये. याची कोणी मागणी केली नव्हती. कशाला आकडेमोड करता. तुम्ही गणिताचे शास्त्रज्ञ आहात का? कशाला सांगता EWS आरक्षणाचा किती फायदा झाला? ते फायदे तुम्हालाचा राहूद्या, आम्हाला नका देऊ, तुमच्या हातात दोन दिवस आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका, 24 तारखेपर्यंत आरक्षण दिले नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

‘चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षणच आमचं लक्ष्य’; जरांगेंच्या समर्थनात ‘मराठा’ मैदानात

जरांगे पाटील म्हणाले की, सारथी सारख्या इतर समाजासाठी देखील संस्था आहेत. तुम्ही हे सांगितले का? जसं EWS चे फायदे सांगत आहात तसे बाकीच्यांना आरक्षण आहे. त्यांची आकडेमोड केली का? मराठा समाजाच्या आरक्षणचा विषय आला की जाहिराती द्यायला पैसे आमचे, जाहिरातींनी आर्धे पानं छापून आणणार आणि आम्हालाच सांगणार काय फायदा झाला, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube