Download App

गाबा कसोटी ड्रॉ, WTC Final साठी जाणून घ्या कसे असेल भारताचे समीकरण

WTC Final Scenario: बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने पाच सामन्याची मालिका आता

  • Written By: Last Updated:

WTC Final Scenario: बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने पाच सामन्याची मालिका आता 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारतासाठी नविन समीकरण समोर आले आहे. 2023-25 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारताचे फक्त दोन सामने शिल्लक आहे. तर दुसरीकडे अंतिम फेरीचे इतर दावेदार दक्षिण आफ्रिकेला (South Africa) देखील एक कसोटी मालिका खेळायची आहे. तर ऑस्ट्रेलियाला (Australia) भारता विरुध्द दोन सामने आणि श्रीलंकेविरुध्द दोन सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारत पात्र ठरणार का? हे पाहावे लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबल

गाबा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइट टेबलमध्ये फार बदल झालेला नाही. दक्षिण आफ्रिका सहा विजय, तीन पराभव आणि एक ड्रॉसह पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा पीसीटी 63.33 आहे. तर 14 सामन्यांत नऊ विजय, चार पराभव आणि एका ड्रॉसह दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाचा पीसीटी 60.71 आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारताने आतापर्यंत 16 सामन्यांत नऊ विजय, सहा पराभव आणि एक सामना ड्रॉ केला आहे. भारताचा पीसीटी 57.29 आहे.

जाणून घ्या नविन समीकरण

जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर भारताचे पीसीटी 60.52 पर्यंत वाढेल. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तरी ऑस्ट्रेलिया भारताच्या मागे असेल.

श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांपैकी किमान एक सामना अनिर्णित राखला तर भारत एक विजय आणि एक अनिर्णित राहूनही ऑस्ट्रेलियाच्यावर राहू शकतो.

भारताने या मालिकेतील उरलेल्या दोन कसोटी सामन्यांपैकी एकही गमावला, तर श्रीलंकेने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव करेल अशी आशा भारताला करावी लागेल.

संन्यास घेतला की दिला? अश्विनच्या अचानक निवृत्तीमुळे अनेक चर्चांना उधाण

उरलेल्या दोन सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेला आपले स्थान निश्चित करता येईल. पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला तर त्यांना फक्त एका विजयाची गरज आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा निकाल दुसऱ्या अंतिम फेरीतील खेळाडू ठरवेल.

follow us