Download App

Asian Games 2023 : भालाफेकमध्ये भारताने रचला इतिहास; नीरज पुन्हा ‘गोल्डन बॉय’

  • Written By: Last Updated:

Asian Games 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Niraj Chopra) चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. नीरजने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 17 सुवर्णपदके जिंकली आहेत. अंतिम फेरीत 88.88 मीटर थ्रो करून नीरजने सुवर्णपदक जिंकले. तर, भारतीय किशोर जेनाने रौप्यपदक पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने भालाफेकमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे, भारताच्या पुरुष संघाने 4×400 मीटर रिलेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. (Niraj Chopra Win Gold In Asian Games)

खेळाची सुरूवात नीरजसाठी काही विशेष राहिलीन नाही. त्याचा पहिलाच थ्रो फाऊल घोषित करण्यात आला. नीरजची पहिला थ्रो सुमारे 90 मीटर होता. पहिला थ्रो फाऊल ठरवल्यानंतर नीरजचा अधिकाऱ्यांशी बराच वेळ वाद झाला. यामुळे काही काळासाठी खेळ थांबवावा लागला होता. नीरजने पहिला फेक मारला तेव्हा अंतर मोजण्याच्या यंत्रात समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे त्या थ्रोला फाऊल घोषित करण्यात आले. भारताच्या नीरज चोप्राला सुवर्ण पदक, किशोर जेना याला रौप्य, तर जापानच्या रोडरिक जेनकी डीन याला कांस्य पदक मिळालं. नीरज चोप्रा याने 2018 मध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं.

Asain Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेचा डबल धमाका; 5 हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक

25 वर्षीय स्टार अॅथलीट नीरजने नुकतेच बडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. मात्र, गेल्या महिन्यात त्याला डायमंड लीगचे विजेतेपद पटकवात आले नव्हते. चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेझने त्याला पराभूत करत डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले होते.

World Cup : महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार नसून चित्रपट दिग्दर्शक; अश्विनच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

आतापर्यंत भारताने 18 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य पदकांसह 81 पदके जिंकली आहेत. तर तिरंदाजीमध्ये ज्योती वेण्णम आणि ओजस देवतळे यांनी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 70 पदके जिंकली होती. म्हणजेच यावेळी भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम केला असून एकूण 70 हून अधिक पदकांची कमाई केली आहे.

Tags

follow us