Hardik Pandya : आयसीसी विश्वचषक सामन्यांना सुरुवात झाली आहे. येत्या 8 ऑक्टोबरला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना रंगणार आहे. या सामन्याआधीच भारतीय संघासाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू या सामन्यामध्ये खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. भारतीय संघाचा स्टार हार्दीक पांड्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. हार्दीक पांड्याच्या जागी आता शार्दुल ठाकूर खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे.
स्वार्थी नेत्यांनी आपल्या उद्गात्याला निवडणूक आयोगाच्या दारात…; रोहित पवारांची टीका
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे तो विश्वचषकातील पहिले काही सामने खेळू शकणार नाही. आता भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यालाही दुखापत झाली आहे. सरावाच्या वेळी त्याला दुखापत झाली असून त्याच्या खेळावर सस्पेंस आहे. हार्दीक पांड्याच्या जागी शार्दुल ठाकूर खेळणार असल्याचं निश्चित झाल्याचं मानलं जात आहे.
Hardik Joshi: राणादाचा नवा सिनेमा ‘क्लब 52 ‘या’ दिवशी करणार धमाल
विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून भारतीय संघासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल डेंग्यूने आजारी पडला असून भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणार्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी जखमी झाला आहे.
रणबीरनंतर आता कपिल शर्मा, हुमा कुरेशीला ED चे समन्स, सखोल चौकशी होणार
सरावादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. आता त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. पण त्याला दुखापत झाल्याचंच समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो फिट नसल्यास त्याला सामन्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
भाजपकडे बहुमत असताना ते माझ्यासारख्याचं का ऐकत होते? पवारांचा फडणवीसांना खोचक सवाल
जर हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी फिट नसेल तर भारतीय संघात त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळवू शकते. शार्दुल ठाकूर हा भारतीय संघातला एकमेव असा खेळाडू आहे जो हार्दिक पांड्याच्या जागी पसंतीस उतरला आहे. ठाकूर हार्दिकप्रमाणे वेगवान गोलंदाजी करतो आणि खालच्या क्रमाने मोठे चौकार आणि षटकार कसे मारायचे हे देखील जाणतो. हार्दिक पंड्याची दुखापत वेळीच बरी झाली नाही, तर शार्दुल ठाकूर 8 ऑक्टोबरला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित आहे.