नवी दिल्ली : भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha) पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. उदयपूरमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. आज 14 तारखेला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) ला हे लग्न होणार आहे. याआधी दोघांनी 31 मे 2020 रोजी कोर्ट मॅरेज केले होते. मात्र, यावेळी ते पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. विशेष म्हणजे या दोघांना अगस्त्य नावाचा दोन वर्षांचा मुलगा देखील आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच 14 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. दोघांनी 2020 मध्ये अचानक लग्न करून सर्वांना चकित केले. दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचे नाव अगस्त्य आहे. दोघेही उदयपूरला पोहचले आहे. जिथे नताशा स्टॅनकोविकने काळ्या रंगाचा टॉप आणि मॅचिंग पॅन्ट घातली होती. तर, हार्दिक पांड्याने ऑल ब्लॅक लुक अवलंबला.
खासदार Sanjay Raut आज नाशिक दौऱ्यावर; काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
दरम्यान या जोडप्याने 3 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर त्यांना मोठ्या थाटात लग्न करायचे होते. दरम्यान हे जोडपे पुन्हा एकदा विवाह बंधनात जोडले जाणार आहे. 13 फेब्रुवारीपासून सुरू होणारा विवाह सोहळा 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये हळदी, मेहंदी, संगीत असे कार्यक्रम होणार आहेत. त्याचवेळी गेल्या 1 वर्षापासून त्याची तयारी सुरू होती. दोघेही आता लग्न करणार आहेत.
सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक तिच्या माजी प्रियकर अली गोनीसोबत नच बलिए सीझन 9 मध्ये दिसली. हार्दिक आणि नताशा एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. येथूनच दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.