हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्समध्ये? एका पोस्टने वाढली मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधूक!

Hardik Pandya दिल्ली कॅपिटल्सच्या एका पोस्टमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहते गोंधळात, हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्समध्ये जाण्याची शक्यता

Hardik Pandya

Hardik Pandya

Hardik Pandya’s possible move to Delhi Capitals: आयपीएल 2027 च्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या संभाव्य संघबदलांच्या चर्चांना वेग आला आहे. त्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) नाव विशेष चर्चेत आहे. सोशल मीडियावरील दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) एका पोस्टमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

चेन्नई IPL 2027 साठी तयार; इंग्लंडचा ‘हा’ स्टार खेळाडू मुख्य प्रशिक्षक?

दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हार्दिक पांड्याचा एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये हार्दीक पांड्या दिल्ली कॅपिटल्स महिला संघाची अष्टपैलू खेळाडू मिन्नू मणी (Minnu Mani) हिच्यासोबत आहे . या पोस्टला फ्रँचायझीने ‘दोन भारतीय अष्टपैलू खेळाडू एकमेकांशी बोलत आहेत’ असे कॅप्शन देत हार्ट इमोजीही वापरला. पोस्ट समोर येताच चाहत्यांनी हार्दिकच्या दिल्लीतील संभाव्य एन्ट्रीबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात केली.

हार्दिक दिल्लीच्या जर्सीत दिसणार?

हार्दिक पांड्या आयपीएल 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यामागे मुंबई इंडियन्सची मागील हंगामातील कामगिरी आणि हार्दिकच्या संघातील भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चाही कारणीभूत आहेत.

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेल अटकेत; लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप

मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीनंतर हार्दिक संघ सोडण्याच्या शक्यतेबाबत चर्चा रंगली होती. त्याचवेळी त्याचा माजी संघ गुजरात टायटन्समध्ये पुनरागमनाच्या चर्चांनीही जोर धरला होता. मात्र, कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून हे समीकरण जुळले नसल्याचे वृत्त आहे. हार्दिकला पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी हवी होती, तर गुजरातकडून शुभमन गिलला कायम ठेवण्याला प्राधान्य असल्याचे सांगितले जाते.

दिल्लीच्या पोस्टने वाढवली उत्सुकता

गुजरातसोबतचे समीकरण बिघडल्यानंतर हार्दिकच्या पुढील संघाबाबत उत्सुकता वाढलेली असतानाच दिल्ली कॅपिटल्सच्या पोस्टने नव्या चर्चेला सुरुवात केली आहे. मात्र, या पोस्टवरून हार्दिकच्या दिल्लीतील प्रवेशाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

IPL 2027: हार्दिक पंड्याच्या ट्रेडची चर्चा; गुजरात टायटन्सकडे ठेवली होती कर्णधारपदाची अट?

दरम्यान, दिल्लीकडे अक्षर पटेलच्या रूपाने अष्टपैलू खेळाडू आणि नेतृत्वाचा पर्याय आधीपासूनच आहे. त्यामुळे हार्दिकचा दिल्ली संघात समावेश झाल्यास त्याची भूमिका नेमकी काय असेल, याबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या दिल्ली कॅपिटल्सची पोस्ट ही केवळ सोशल मीडिया पोस्ट आहे की त्यामागे आगामी आयपीएलसाठी काही मोठे समीकरण दडले आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version