Download App

अश्विन निवृत्त झाला अन् वादात अडकला, म्हणाला, “हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाही तर..”

आर. अश्विनने एका महाविद्यालयातील कार्यक्रमात हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. हिंदी भाषा भारताची राष्ट्रीय भाषा नाही.

R Ashwin on Hindi Language : टीम इंडियातून नुकताच निवृत्ती जाहीर केलेला स्टार खेळाडू आर. अश्विन (Ravichandran Ashwin) नव्याच वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खरंतर हा वाद त्याने स्वतःच ओढवून घेतला आहे. आर. अश्विनने एका महाविद्यालयातील कार्यक्रमात हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे तो फॅन्सच्या निशाण्यावर आला आहे. हिंदी भाषा भारताची राष्ट्रीय भाषा नाही असे अश्विन म्हणाला.

निवृत्त झाल्यावर रविचंद्रन अश्विनकडे भरपूर वेळ आहे. नुकताच तो एका खासगी महाविद्यालयाच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनी कार्यक्रमात पोहोचला होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अश्विन म्हणाला की तुम्ही कोणत्या भाषेतून भाषण ऐकणं पसंत करताल. इंग्लीश की तमिळ की हिंदी.. हिंदीबद्दल त्याने विद्यार्थ्यांना विचारलं तर सगळेच शांत झाले. त्याचवेळी हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा नाही असे अश्विन म्हणाला.

तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र

अश्विनने भाषणाच्या सुरुवातीलाच विचारलं होतं की कुणाला इंग्लीशमधून त्याचं भाषण आवडेल. यावर विद्यार्थ्यांनी हलक्याफुलक्या प्रतिक्रिया दिल्या. पण ज्यावेळी त्याने तमिळ भाषेबाबत विचारलं तेव्हा समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी जोरात आवाज केला. नंतर अश्विनने हिंदीबद्दल प्रश्न विचारला तर सगळीकडेच शांतता पसरली. नंतर काही वेळाने एक दोघा जणांनी आवाज मात्र केला. पुढे अश्विन म्हणाला, मला वाटतं की हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाही. ही एक अधिकारिक भाषा आहे.

अश्विनच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. विविध प्रकारच्या प्रतिक्रियांचा पाऊसच पडला आहे. काही जणांनी अश्विनचं समर्थनही केलं काही जणांनी मात्र त्याच्या या वक्तव्याचा जोरदार विरोध केला. अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकूण 106 कसोटी सामने खेळले आहेत. 116 एकदिवसीय आणि 65 टी 20 सामन्यातही अश्विन खेळला आहे. या सामन्यांतील गोलंदाजीचा विचार केला तर कसोटी सामन्यांत 537, एकदिवसीय सामन्यांत 156 आणि टी 20 सामन्यांत 72 विकेट त्याच्या नावावर आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाजीत त्याने सहा शतके देखील केली आहेत.

संन्यास घेतला की दिला? अश्विनच्या अचानक निवृत्तीमुळे अनेक चर्चांना उधाण

follow us