Team India : भारतीय संघाची जोरदार कामगिरी सध्या सुरू आहे. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची (Team India) कसोटी मालिका संघाने जिंकली आहे. या मालिकेतील अंतिम सामना अजून बाकी आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला दुसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून कडवी टक्कर पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे यंदा टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघात दोन कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने जर 2-0 असा विजय मिळवला तर हा संघ प्रथम क्रमांकावर पोहोचेल. परंतु, याासाठी भारतालाही पुढील कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागेल. परंतु, भारताने हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसू शकतो.
Team India : जिंकल्याचा फायदा नाहीच! टीम इंडियाचा दुसरा नंबर कायम; नेमकं काय घडलं?
या मालिकेत जर न्यूझीलंडने विजय मिळवला तर त्यांचा प्रथम क्रमांक अधिक मजबूत होईल. जागतिक कसोटी स्पर्धेत पहिल्या दोन संघात अंतिम सामना होत असतो. सध्या न्यूझीलंड प्रथम क्रमांकावर आहे तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाही भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघापैकी दोन संघ अंतिम फेरीत दाखल होऊ शकतात. आता हे दोन संघ कोणते असतील याचं उत्तर थोड्याच दिवसांत मिळेल.
या स्पर्धेतील पहिल्या हंगामात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले होते. दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. म्हणजेच दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आता टीम इंडिया अंतिम फेरीत प्रवेश करून विजेतेपद पटकावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, टीम इंडियाने (Team India) संघाने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने खेळाच्या चौथ्या दिवशी (२६ फेब्रुवारी) १९२ धावांचे लक्ष्य गाठले. शुभमन गिल ५२ धावा करून नाबाद राहिला आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) ३९ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली.
IND vs ENG Test : यशस्वी, रोहित नंतर रजतसह भारताचा तिसरा बळी, टीम इंडियाला विजयासाठी 92 धावांची गरज