Download App

‘मी पंतप्रधान मोदींना विनंती करेन…’, माजी पाकिस्तानी कर्णधार आफ्रिदीचं मोठं विधान

  • Written By: Last Updated:

आशिया कप 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण, भारत आणि पाक यांच्यातील वैर हे जगजाहीर आह. त्यामुळं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी टीम इंडिया पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) विनंती केली आहे.

क्रिकेटविश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची प्रत्येक चाहत्यांना प्रतीक्षा असते. मात्र दोन्ही देशांमधील तणावाच्या संबंधामुळं या दोन्ही देशांदरम्यान गेल्या 11 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने येत असतात. मात्र आता पाकिस्तान क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानं या प्रकरणावर पीएम मोदी यांच्याकडे दाद मागितली आहे. त्याने असं म्हटले आहे की तो दोन्ही देशांमधील क्रिकेटसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणार आहे.

लीजेंड लीग क्रिकेट (LLC) स्पर्धा दोहा, कतार येथे खेळली गेली. अंतिम सामन्यात (20 मार्च), आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील आशिया लायन्सने वर्ल्ड जायंट्सचा 7 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. या फायनलनंतर आफ्रिदीने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्याने सांगितले की, मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की, दोन देशांमध्ये (भारत-पाकिस्तान) क्रिकेट होऊ द्यावे. भारताने आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात यावं. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा. आम्हाला दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध हवे आहेत. हा काळ भाडंण्याचा नाही, असं आफ्रीदीने सांगितलं. दोन्ही देशांमधील संबंधांवर बोलतांना आफ्रिदी म्हणाला की, जर आपल्याला कुणाशी दोस्ती करायची असेल आणि तो आपल्याशी बोलत नसेल तर आपण या अशा वेळी काय करू शकतो?’

‘आता राष्ट्र, नो महाराष्ट्र’, तावडे म्हणाले मला आता राज्यातील राजकारणात रस नाही 

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात आशिया चषक खेळवायचा की नाही यावर चर्चा सुरू आहे. मुंबईवर कसाबने केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानमध्ये गेली नाही. आणि पाकिस्तानटी टीमही भारत दौऱ्यावर आली नाही. आता आशिया चषक 2023 चे आयोजक पाकिस्तान आहे. पण भारताने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास जायला नकार दिला. त्याच्यावर आफ्रिदीनं बोलतांना हे भाष्य केलं.

आफ्रिदि म्हणाला, ‘बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) खूप मजबूत बोर्ड आहे यात शंका नाही, असंही आफ्रिदी म्हणाला. यावेळी आफ्रिदीने 2005 सालची भारतीय टीम पाकिस्तानात आल्याची आठवणही करून दिली. तेव्हा क्रिकेट चाहत्यांनी खेळाडूंवर प्रेमाचा वर्षाव केला होता, असं त्याने सांगितलं. तो म्हणाला की, मला आठवते की, मी भारतात आलो होतो तेव्हा लोकांनी खूप प्रेम दिल्याचं आफ्रिदीनं सांगितलं.

Tags

follow us