चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सामना कधी आणि कोणासोबत होणार…

Champions Trophy India VS Pakistan On 23 February : आयसीसीने (ICC)  चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केलंय. भारतीय संघाचे सामने (India VS Pakistan) यूएईमध्ये, तर इतर सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्यामध्ये एकूण 15 सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील (Champions Trophy) आपल्या मोहिमेची सुरुवात […]

_sport

_sport

Champions Trophy India VS Pakistan On 23 February : आयसीसीने (ICC)  चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केलंय. भारतीय संघाचे सामने (India VS Pakistan) यूएईमध्ये, तर इतर सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्यामध्ये एकूण 15 सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील (Champions Trophy) आपल्या मोहिमेची सुरुवात 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करेल. भारत, बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांना अ गटात ठेवण्यात आलेत.

अजितदादांनी 2009 सालचा वचपा काढला का? विलास लांडेंनी केली भुजबळांच्या नाराजीवर मोठा खुलासा

ICC ने मंगळवार, 24 डिसेंबर रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. भारत विरुद्ध पाकिस्तान गटातील सामना 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर हा सामना दुबईत खेळला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. बोर्डाने सर्व संघांचे वेळापत्रक जाहीर केलंय. पीसीबीने भारताला सामावून घेण्यासाठी हायब्रीड मॉडेलला सहमती दिल्याने आयसीसीने जाहीर केलंय की पाकिस्तान युएईसोबतच या स्पर्धेचे आयोजन करेल.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मार्की सामना 23 फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. जर भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला तर, दुबई शिखर सामना आयोजित करेल. आयसीसीने जाहीर केले की ही स्पर्धा 19 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कराची येथे सुरू होईल आणि ती 9 मार्चपर्यंत चालेल. उपांत्य फेरी आणि अंतिम दोन्ही सामने राखीव दिवस असतील.

बाबासाहेबांचा अपमान! शाहांचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट; CM फडणवीसांनी दुसरी बाजू मांडली

ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हायब्रीड मॉडेल मंजूर केलंय. यायामध्ये पाकिस्तान आणि UAE यांच्यातील सामने विभाजित केले गेलेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पीसीबी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात झालेल्या करारानंतर ही व्यवस्था निश्चित करण्यात आली. या मॉडेल अंतर्गत, पाकिस्तान 10 सामन्यांचे आयोजन करेल. तर भारताचे तीन लीग-स्टेज सामने, ज्यात पाकिस्तान विरुद्ध बहुप्रतीक्षित लढतीचा समावेश आहे, दुबईमध्ये होतील. भारताने अंतिम फेरी गाठल्यास उपांत्य फेरीतील एक आणि अंतिम सामनाही दुबईत खेळला जाईल. मात्र, भारताने साखळी फेरीनंतर स्पर्धेतून बाहेर पडल्यास, हे सामने पाकिस्तानातील लाहोर आणि रावळपिंडी येथे स्थलांतरित होतील.

चॅम्पियन्स ट्रॉफी गट

अ गट: बांगलादेश, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान
ब गट: अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: वेळापत्रक

19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
9 मार्च – फायनल – गद्दाफी स्टेडियम, लाहोर

 

Exit mobile version