Download App

Indore Stadium Pitch Rating : बीसीसीआयसमोर आयसीसीने गुडघे टेकले, अपीलनंतर बदलला निर्णय…

नवी दिल्ली : इंदोरच्या स्टेडियमसंदर्भात बीसीसीआयने अपील केल्यानंतर आता आयसीसीसीला निर्णय बदलावा लागला आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टीची खराब म्हणून वर्गीकृत करण्यात आली होती आता मात्र, आयसीसीला खेळपट्टीचे रेटिंग बदलावे लागले आहे.

गौतमी पाटीलसाठी तृप्ती देसाई मैदानात, इंदुरीकरांवर टीका करत म्हणाल्या…

बीसीसीआयने खेळपट्टीच्या रेटिंगविरोधात अपील केले होते. इंदोरच्या मैदानाची खेळपट्टी कोणासाठीही धोकादायक नाही, असा युक्तिवाद बीसीसीआयने केला होता. त्यानंतर आयसीसीने या खराब रेटिंगऐवजी सरासरीपेक्षा कमी रेटिंग दिले आहे. आता या खेळपट्टीला 3 डिमेरिट पॉईंट ऐवजी फक्त एक डिमेरिट पॉईंट मिळणार आहे.

14 मार्चला बीसीसीआयने आयसीसीकडे निर्णयाचं पुनरावलोकन करण्याची मागणी केली. आता आयसीसीने आढावा घेतल्यानंतर आपला निर्णय बदलला आहे. आयसीसीने इंदोरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टी ‘खराब’ श्रेणीतून ‘सरासरीपेक्षा कमी’ केली आहे.

महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी…! रिक्षा चालकाने खाणीत उडी घेत केली आत्महत्या

इंदोरच्या मैदानात कसोटच्या पहिल्याच दिवशी 14 विकेट पडल्या होत्या. सामन्यात 31 पैकी 26 विकेट फिरकीपट्टूंनी घेतल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. या सामन्यानंतर मैदानाच्या खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्याला माजी कर्णधार सुनील गावस्करांनी हास्यास्पद म्हटलं होतं.

खेळपट्टीवर कोणत्याही फलंदाजाला धोका नव्हता, मग ही खेळपट्टी कशी बिघडली. यानंतर बीसीसीआयने मॅच रेफरीच्या निर्णयाविरोधात अपील केले, त्यानंतर आयसीसीला खेळपट्टीचे रेटिंग बदलावे लागले, असं गावसकर म्हणाले होते.

उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त; हर्षवर्धन पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, कसोटीत झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचे नूकसान झाले आहे. त्यानंतर अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली होती. यासोबतच टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडमध्ये पहिल्या कसोटीत पराभूत होताच, टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले.

भारताची अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया संघाशी सामना होणार असून हा सामना 7 जूनला इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलिया प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर दुसरीकडे टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Tags

follow us