उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त; हर्षवर्धन पाटलांचा ठाकरेंवर निशाणा
मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil)यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत म्हणून ते माझ्या नावाचा वारंवार उल्लेख करतात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी माझ्यावर अन्याय झाल्याने कॉंग्रेस (Congress)पक्ष सोडला असेही यावेळी हर्षवर्धन पाटलांनी म्हटले आहे. स्वाभिमानी (self-respecting)होतो म्हणून भाजपमध्ये (BJP)गेलो आहे, गेल्या 25 वर्षांमध्ये माझी एकही चौकशी सुरु नाही असं पाटलांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले आहे.
मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप नव्हे तर भ्रष्ट जनता पार्टी असा उल्लेख केला आहे. कारण सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजमध्ये प्रवेश दिला जातो, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावेळी हर्षवर्धन पाटलांचा उल्लेख केला. त्यावर हर्षवर्धन पाटलांनी उद्धव ठाकरेंना परखड शब्दात उत्तर दिलं आहे.
Bacchu Kadu : मला गद्दार गद्दार म्हणतात, मी गद्दारी का केलीय? बच्चू कडूंनी सांगितलं, कारण…
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, मला वाटतं उद्धव ठाकरेंनी माझ्या नावाचा उल्लेख बऱ्याचदा केला आहे. मला असं वाटतं की, ज्यांनी त्यांना माझ्याविषयी माहिती दिली ती अपुरी दिली असेल किंवा ज्यांनी ती स्क्रीप्ट लिहून दिली असेल ती अपुऱ्या माहितीच्या आधारे दिली असल्याचं यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले की, बऱ्याचदा माझ्या नावाचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला आहे. सभागृहात, भाषणात, पत्रकार परिषदेतही माझ्या नावाचा उल्लेख केला. मला असं वाटतं की, त्यांना चुकीची माहिती दिली आहे. आज मी स्पष्ट करतो की, मी भाजपमध्ये गेलो, त्याला चार वर्ष झाले आहेत. मी भाजपमध्ये का गेलो कारण माझ्यावर प्रचंड अन्याय कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाला, आम्ही प्रामाणिकपणे काम करुनही आमचा स्वाभिमान दुखावला गेला.
आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम करुनही त्यांनी अन्याय केला. तो अन्याय एकदा झाला नाही तर तो चारवेळा झाला. त्याचा अर्थ आमच्यावर काही चौकश्या होत्या म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो असा होत नाही, असंही यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले.
बऱ्याचदा चोराच्या मनात चांदणं असतं, पण आमच्या मनात तसं काही नाही, आमच्यावर अन्याय झाला होता, त्यामुळे आम्ही भाजपमध्ये गेलो असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटलांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि नंतर बोलावे असा सल्ला हर्षवर्धन पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.