Bacchu Kadu : मला गद्दार गद्दार म्हणतात, मी गद्दारी का केलीय? बच्चू कडूंनी सांगितलं, कारण…
गेल्या ७० वर्षात धर्म जातीच्या नावाखाली दिशाहीन करण्याचे काम केले गेलं. आज देखील आपल्या सर्वाना खऱ्या मुद्यापासून आम्हाला दूर नेण्याचे काम केलं जातंय. मला गद्दार म्हणताय मात्र मी गद्दारी का केली? मी दिव्यांगासाठी गद्दारी केली, असं वक्तव्य माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येवला येथे बोलताना केलं. येवला तालुक्यातील पाटोदा गावात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी आमदार बच्चू कडू हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी अपंगांच्या प्रश्नांवर भाष्य केलं.
त्यावेळी बोलताना कडू म्हणाले की मला गद्दार म्हणताय मात्र मी गद्दारी का केली? मी दिव्यांगासाठी गद्दारी केली. इतक्या वर्ष संघर्ष करूनही दिव्यांगसाठी कायदा निघाला मात्र शासन निर्णय निघत नव्हता, ते काम आम्ही केलय. दिव्यांगच्या प्रश्नांवर इतक्या काहीच काम झालं नव्हतं. पण आम्ही ८२ शासन निर्णय काढले. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Radhakrishna Vikhe Patil : राहुल गांधीची सावरकरांवरची टीका प्रसिद्धीसाठीच, काँग्रेसचे जहाज भरकटलेले
याच कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की आपल्याकडे असे काही लोक आहेत, ज्याला आईचा चेहरा माहित नाही. झाडं कस दिसत माहित नाही, झाडाचा हिरवा रंग माहित नाही. त्याला तुम्ही हिरवा, भगवा काय सांगणार. ज्याला ऐकता येत नाही त्याला शिवगर्जना काय सांगणार? अशी खंत त्यावेळी त्यांनी बोलून दाखवली.
महाराष्ट्र पहिले राज्य
इतक्या वर्ष संघर्ष केल्यानंतर राज्यात दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले. पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. दिव्यांग बांधवासाठी आम्ही आजवर ८२ शासन निर्णय काढले.
कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं..चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान; शिंदे गटाचं वाढलं टेन्शन