Radhakrishna Vikhe Patil : राहुल गांधीची सावरकरांवरची टीका प्रसिद्धीसाठीच, काँग्रेसचे जहाज भरकटलेले
देशात काँग्रेसच्या बाजूने निकाल गेला तर सत्तेचा दुरुपयोग आणि काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अशा प्रतिक्रिया येतात. ही काँग्रेसची राजकारणातली दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेसचे जहाज भरकटलेले आहे. अशी टीका राहुल गांधी यांच्या प्रकरणावरून राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत भाष्य करतात. भारत जोडो यात्रेच्या वेळीही आपली दखल घेतली जात नाही, असं लक्षात येतात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं, असंही यावेळी विखे पाटील म्हणाले आहेत. त्याशिवाय राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन देखील मुक्ताफळे उधळली आहेत, अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधींवरील कारवाईनंतर पवन खेडांनी का मागितली माफी?
२०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसला ४० ची संख्याही गाठता आली नाही, हे काँग्रेसचे अपयश होते. राहुल गांधी यांचे ते अपयश होते. असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. दुसरीकडे त्यांनी मोदी सरकारच्या कामकाजाचे कौतुक केले. यावर बोलताना ते म्हणाले जगात अनेक देशात आर्थिक संकटे येत आहेत. अनेक देशाच्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. पण अशी परिस्थिती असतानाही भारत मात्र चांगली कामगिरी करत आहे. हे मोदी सरकारचे यश आहे. असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली राजघाटावर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, तर उद्या सोमवारी काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून निषेध नोंदवण्यासाठी संसदेत पोहोचणार आहेत.
कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं..चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान; शिंदे गटाचं वाढलं टेन्शन
याच अनुषंगाने काँग्रेसने विरोधी पक्षांच्या इतर पक्षांनाही काळे कापड किंवा काळे पट्टे घालून संसदेत येण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता विरोधी पक्षांची बैठक बोलावली असून त्यात सोमवारच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.
त्याचबरोबर युवक काँग्रेस जंतरमंतरवरही आंदोलन करणार आहे. बैठकीनंतर दुपारी एक वाजता संसदेला घेराव घालण्याचा कार्यक्रम आहे. दुसरीकडे, रविवारी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जंतर-मंतर रस्त्यावर ‘मशाल मिरवणूक’ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.